सातारा - आईने जेवण वाढलं नाही म्हणून मुलानं पाण्याचा हंडा डोक्यात घालून जन्मदात्या आईची हत्या केली. पिंगळी बुद्रुक (ता. माण) या गावात शुक्रवारी रात्री ही खळबळजनक घटना घडली. संगीता आनंदराव जाधव (वय ४८), असं मातेचं नाव आहे. याप्रकरणी संशयित विशाल आनंदराव जाधव याला पोलिसांनी अटक केली आहे.
दारूच्या नशेत केली आईची हत्याृ विशाल याला दारूचं व्यसन होतं. तो रोज दारू पिऊन रात्री उशीरा घरी यायचा. शुक्रवारीही (१० जानेवारी) दारू पिऊनच तो घरी आला होता. त्यानं आईला जेवायला मागितले. आई त्यावेळी झोपली होती. म्हणून हाताने घेऊन खा, असं आई म्हणाली. त्यावरून त्यानं आईसोबत भांडायला सुरुवात केली. त्यानंतर वाद वाढत गेला. रागाच्या भरात विशालनं पाण्याचा हंडा घेऊन आईच्या डोक्यावर सलग प्रहार केले.
- उपचारापूर्वीच झाला मृत्यू - पोलिसांना घटनेची माहिती कळताच दहिवडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गंभीर जखमी झालेल्या संगीता जाधव यांना दहिवडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना सातारा जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं.
- संशयिताला पोलिसांनी केली अटक-या घटनेची माहिती मिळताच दहिवडीच्या डीवायएसपी अश्विनी शेंडगे यांनी घटनास्थळी भेट दिली. दहिवडी पोलिसांनी संशयित मुलाला तात्काळ अटक केली. या घटनेमुळे माण तालुक्यात मोठी खळबळ माजली आहे. पोटच्या मुलानं क्रुरतेची परिसीमा गाठल्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
ठाण्यात कोडीन फॉस्फेटच्या १९२ बाटल्या जप्त- अमली पदार्थांचे व्यसन करत अनेकजण विविध पद्धतींचा वापर करतात. त्यामध्ये कोडीन-आधारित सिरपचे सेवन करण्याचादेखील समावेश होतो. ठाण्यात पोलिसांनी बंदी लागू असलेल्या सिरपच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. ठाणे जिल्ह्यात कोडीन फॉस्फेटचा बेकायदेशीरपणे वापर आणि विक्री केल्याबद्दल पोलिसांनी दोघांना अटक केली आहे, असे ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यानं रविवारी सांगितले. कोडीन फॉस्फेट असलेल्या कफ सिरपचा मोठ्या प्रमाणात गैरवापर केला जातो. कल्याण परिसरातील कचोरे गावात पोलिसांनी शनिवारी दोघांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून कोडीन फॉस्फेटच्या १९२ बाटल्या जप्त केल्या आहे, असे कल्याणचे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी सांगितले. नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (एनडीपीएस) कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची त्यांनी माहिती दिली.
हेही वाचा-