मुंबई - रॅपर हनी सिंगचा 'मिलियनेअर इंडिया म्युझिकल टूर' सध्या खूप चर्चेत आहे. भारतातील 10 शहरांमध्ये होणाऱ्या कॉन्सर्ट कार्यक्रमाची तिकिटे आजपासून लाईव्ह होणार आहे. या संपूर्ण टूरच्या तारखा आणि तिकिटे खरेदी करण्याचे मार्ग तुम्ही जाणून घेऊ शकता. दिलजीत दोसांझनंतर, हनी सिंग त्याच्या 'मिलियनेअर इंडिया म्युझिकल टूर'द्वारे प्रेक्षकांवर जादू करण्यासाठी सज्ज आहे. त्याचा हा टूर भारतातील 10 शहरांमध्ये होईल. हनी सिंगनं त्याच्या नेटफ्लिक्स माहितीपट, 'यो यो हनी सिंग: फेमस' हा प्रदर्शित झाल्यानंतर या टूरची घोषणा केली.
हनी सिंगच्या कॉन्सर्टची तिकिटे कशी खरेदी करू शकता : हनी सिंगच्या इंडिया कॉन्सर्टची तिकिटे झोमॅटोच्या डिस्ट्रिक्ट अॅपद्वारे विकली जात आहे. तिकिटे शनिवार, 11 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजतापासून विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत. तुम्ही ही तिकिट बुक करू शकता, या शोचा एकूण कालावधी चार तासाचा आहे. हनी सिंगच्या काही गाण्यांच्या थीम लक्षात घेता हा शो 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांसाठी नाही. हनी हनी सिंगनं बऱ्याच काळानंतर स्टेजवर परफॉर्म करणार आहे. त्यामुळे आता त्याच्या म्युझिकल कॉन्सर्टबद्दल अनेकांना खूप अपेक्षा आहेत.
हनी सिंग मिलियनेअर इंडिया टूर :
हनी सिंग यावर्षी फेब्रुवारीपासून भारतातील 10 शहरांमध्ये कॉन्सर्ट करणार आहे. हा टूर 22 फेब्रुवारी रोजी मुंबईत सुरू होत असून 3 एप्रिल रोजी कोलकाता येथे याचा समारोप होईल. हनी सिंगच्या मिलियनेअर इंडिया टूरच्या सर्व शोची वेळ संध्याकाळी 6 वाजता आहे. दरम्यान हनी सिंगनं अलीकडेच इंस्टाग्रामवरील एका व्हिडिओ शेअर केला होता, यामध्ये त्यानं चाहत्यांना तिकिटे खरेदी करण्यास प्रोत्साहित केले होते. या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं होतं, 'मित्रांनो, हा अनुभव चुकवू नका, करमपुराच्या रस्त्यांपासून ते करोडपतींच्या गल्लीत तुमचा योयो येतोय.' मिलियनेअर टूर हा फक्त एक टूर नाही, तर ती माझी कहाणी आहे, जी मी आता तुम्हा सर्वांबरोबर जगणार आहे. 11 जानेवारी. फक्त @district.bulletin वर तिकिटे मिळवा.' हनी सिंगच्या शोसाठी अनेकजण उत्सुक आहे.
कॉन्सर्टची तारीख
मुंबई 22 फेब्रुवारी
लखनौ 28 फेब्रुवारी
दिल्ली 1 मार्च
इंदूर 8 मार्च
पुणे 14 मार्च
अहमदाबाद 15 मार्च
बेंगळुरू 22 मार्च
चंदीगड 23 मार्च
जयपूर 29 मार्च
कोलकाता 5 एप्रिल
हेही वाचा :