महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

"स्वप्न खरं झालं": गोपीचंद मालिनेनी दिग्दर्शित चित्रपटात सनी देओलबरोबर भूमिका साकारणार सैयामी खेर - Saiyami Kher - SAIYAMI KHER

Saiyami Kher : अभिनेता सनी देओलबरोबर काम करण्याची संधी मिळाल्यामुळं अभिनेत्री सैयामी खेरला आनंद झाला आहे. स्वप्नं खरं होतं असल्याची भावना तिनं व्यक्त केली आहे.

Saiyami Kher
सनी देओलबरोबर भूमिका साकारणार सैयामी खेर (ANI)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 21, 2024, 5:03 PM IST

मुंबई -Saiyami Kher " अभिनेत्री सैयामी खेर आगामी चित्रपटात सनी देओलबरोबर स्क्रिन स्पेस शेअर करण्यासाठी सज्ज झाली आहे. चित्रपट निर्माता गोपीचंद मालिनेनी यांच्या पुढील चित्रपटात ती आणि सनी देओल एकत्र काम करणार आहेत. या चित्रपटाचा आज मुहूर्त व पूजा कार्यक्रम हैदराबादमध्ये पार पडला. हा एक बिग बजेट अ‍ॅक्शन थ्रिल चित्रपट असणार आहे. सनी देओल आणि निर्माता गोपीचंद मालिनेनी यांच्या नावाच्या आद्याक्षरावरुन SDGM असं शीर्षक या चित्रपटाला देण्यात आलंय.

या चित्रपटात सनी देओलबरोबर काम करण्याची संधी मिळतेय याबद्दल सैयामीनं आनंद व्यक्त केला. याबद्दल ती म्हणाली, "SDGM चित्रपटाचा एक भाग बनून मला खूप आनंद झाला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीचा आयकॉन असलेल्या सनी देओलबरोबर काम करणं हा एक महान सन्मान आहे आणि ते एक स्वप्न पूर्ण झालं आहे. 'घूमर' चित्रपटानंतर ही संधी माझ्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे," असं एका निवेदनात ती म्हणाली.

सैय्यामी खेरनं सांगितलं की, ती एका योग्य व्यावसायिक सिनेमाचा भाग होण्यासाठी ती प्रतीक्ष करत होती. गोपीचंद मालिनेनी यांच्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाल्यामुळं तिला आनंद झाला आहे. ती पुढे म्हणाली, "मी एका योग्य व्यावसायिक चित्रपटाचा भाग होण्यासाठी वाट पाहिली आहे. आणि ही संधी मिळाल्याचा मला आनंद झाला आहे. गोपीचंद मालिनेनी यांची चित्रपटासाठीची दृष्टी खरोखरच खूप रोमांचक आहे. हा प्रवास सुरू करण्यासाठी मी जास्त काळ वाट पाहू शकत नाही. माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल आणि मला अशा भव्य व्यासपीठावर माझी क्षमता दाखवण्याची संधी दिल्याबद्दल मी निर्मात्यांची आभारी आहे."

याआधी सनी देओलने या चित्रपटाबद्दल अपडेट शेअर केलं होतं. त्यानं चित्रपटाचं संकल्पना पोस्टर पोस्ट केले आणि देशातील सर्वात मोठ्या अ‍ॅक्शन चित्रपटासाठी सज्ज झाल्याचं चाहत्यांना कळवलं होतं. गोपीचंद मालिनेनी यांनी हा चित्रपटाच्या निर्मितीसह दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारली आहे. चित्रपटाचे नाव अद्याप ठरायचं बाकी आहे. नवीन येरनेनी, वाय रविशंकर आणि टीजी विश्व प्रसाद यांच्या मैत्री मूव्ही मेकर्स आणि पीपल मीडिया फॅक्टरीच्या बॅनरखाली हा चित्रपट तयार केला जाणार आहे.

ऋषी पंजाबी या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी सांभाळणार आहेत, तर संगीत थमन एस करणार आहेत. ट्रेड अ‍ॅनालिस्ट तरण आदर्श यांच्या मते, सैयामी खेर आणि रेजिना कॅसँड्रा या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

हेही वाचा -

  1. बॉलिवूड स्टार्सना लागलं योगासनांचं वेड, सौंदर्यवतींनी शेअर केले योग करतानाचे फोटो - International Yoga Day 2024
  2. 'भिडू... योग करने का, मस्त रहने का' प्रसिद्ध अभिनेता जॅकी श्रॉफ यांचा मुंबईकरांना संदेश - World Yoga Day
  3. "हरिणीचे पाडस व्याघ्रे धरियेले" या पंक्तींप्रमाणे आज आपल्या हृदयाची अवस्था..; ज्येष्ठ गायक हृदयनाथ मंगेशकर - Shivacharitra Ek Soneri Paan song

ABOUT THE AUTHOR

...view details