मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि साऊथ अभिनेत्री पूजा हेगडे यांचा 'देवा' चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटाची क्रेझ आता सोशल मीडियावर देखील पाहायला मिळत आहे. टीझर असो वा धमाकेदार ट्रेलर यामधील शाहिदचा अभिनय अनेकांना आवडला आहे. शाहिद आणि पूजाचे चाहते त्यांचा हा आगामी चित्रपट पाहण्यासाठी खूप आतुर आहेत. या चित्रपटाचं ट्रेलर आणि 'भसड मचा' हे गाणं चाहत्यांना खूप आवडलं आहे. आता शाहिदच्या चाहत्यांनी 'देवा' चित्रपट रिलीज होण्यापूर्वी हिट घोषित केला आहे. सध्या अनेकजण या चित्रपटाच्या रिलीजची वाट पाहात आहेत.
शाहिद कपूर स्टारर 'देवा' चित्रपटाचा क्लायमॅक्स :याशिवाय 'देवा' चित्रपटाचा क्लायमॅक्स काय असेल याबद्दल प्रत्येकजण जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. दरम्यान शाहिद कपूरचा हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 2025मध्ये रिलीज होणार आहे. 'देवा' चित्रपटासाठी अनेक क्लायमॅक्स शूट करण्यात आले आहेत. याशिवाय कलाकार आणि क्रूलाही माहित नाही की, अंतिम टप्प्यात कोणता क्लायमॅक्स ठेवला आहे. 'देवा' चित्रपटाचा क्लायमॅक्स हा निर्मात्यांनी गुप्त ठेवला आहे. आता या चित्रपटामधील क्लायमॅक्स कुठला असेल, याबद्दल एक रहस्य आहे.