महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

रिचा चढ्ढा आणि अली फझल यांनी निर्माते म्हणून केली 6 चित्रपटांची घोषणा, पाहा तपशील - पुशिंग बटन्स स्टुडिओ

अभिनेता रिचा चढ्ढा आणि अली फजल आपले वैवाहिक जीवन सुंदर बनवत असतानाच चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात उतरले आहेत. त्यांनी पुशिंग बटन्स स्टुडिओ या स्वतःच्या प्रॉडक्शन हाऊसची स्थापना केली आहे. या बॅनरखाली त्यांनी 6 चित्रपट बनवायचे टारगेट समोर ठेवले आहे. विविध जॉनरच्या या चित्रपटांचे कथानक कसे असेल याचा तपशीलही त्यांनी शेअर केला आहे.

Richa Chadha and Ali
रिचा चढ्ढा आणि अली फझल

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 27, 2024, 1:07 PM IST

मुंबई- अभिनेता रिचा चढ्ढा आणि अली फजल यांनी फिल्म निर्मितीच्या क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. त्यांनी पुशिंग बटन्स स्टुडिओ या स्वतःच्या प्रॉडक्शन हाऊसचे लॉन्चिंग केलं आहे. या बॅनरखाली त्यांनी 'गर्ल्स विल बी गर्ल्स' हा पहिला प्रोजेक्ट तयार केला आहे.

मंगळवारी रिचा आणि अली यांनी त्यांच्या कंपनीद्वारे तयार केलेल्या इतर प्रोजेक्टबद्दलचा तपशील सांगितला आहे. वेगवेगळ्या जॉनरची निर्मिती करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. त्यानुसार एक प्रौढांसाठी, एक विनोदी, एका व्यंगात्मक, एक डॉक्युमेंटरी आणि एक कल्पनारम्य चित्रपटाची निर्मिती करण्याच त्यांनी ठरवलंय.

आपल्या या नव्या प्रोजेक्टबद्दल उत्साह व्यक्त करताना रिचा म्हणाली, "आम्ही गोष्टी सांगण्याची असलेली आवड आणि नवीन, वैविध्यपूर्ण कथा समोर आणण्याचे ध्येय बाळगून प्रेरित झालो आहोत. सनडान्स येथील 'गर्ल्स विल बी गर्ल्स'च्या यशामुळे सर्जनशीलतेला पुढे नेण्याचा आमचा निर्धार वाढला आहे."

याबद्दल बोलताना अली म्हणाला, "पुशिंग बटन्स स्टुडिओ हे केवळ एक प्रोडक्शन हाऊस नाही तर ते हे कलाकारांसाठी सहयोग, प्रयोग आणि प्रेक्षकांसाठी संस्मरणीय अनुभव निर्माण करण्यासाठी एक व्यासपीठ आहे. आमच्या पाइपलाइनमधील विविध प्रकारच्या प्रोक्ट्सबद्दल आम्ही उत्सुक आहोत."

पुशिंग बटन्स स्टुडिओ या प्रॉडक्शन हाऊसने आगामी काळात निर्माण करत असलेल्या प्रोजेक्ट्सचा तपशील पुढील प्रमाणे आहे.

1. गर्ल्स विल बी गर्ल्स (कमिंग-ऑफ-एज ड्रामा) - शुची तलाटीचा चित्रपट

ही एक 16 वर्षांच्या मीरा नावाच्या बोल्ड आणि बंडखोर मुलीची कथा आहे. तिच्या आयुष्यात तिची तरुण आई हस्तक्षेप करते. असे या चित्रपटाचे कथानक आहे.

2. पापिता (क्राइम थ्रिलर) - आकाश भाटियाचा चित्रपट

पोरस बिश्त, हा एक मुंबईचा असा पापाराझी फोटोग्राफर आहे, ज्याला लपून काही गोष्टी निरखायचा विकार जडला आहे. तो त्याच्या व्यवसायाच्या पलीकडे जाऊन एक प्रतिष्ठित छायाचित्रकार बनण्याची इच्छा बाळगून असतो. त्याच्या या गोष्टीला एक वळण लागते जेव्हा तो एका प्रख्यात सेलिब्रिटीचा समावेश असलेला एक महत्त्वाचा क्षण कॅप्चर करतो आणि त्याचे करिअर आणि आयुष्य दोन्ही बदलून जाते.

3. डॉगी स्टाइलेज (प्रौढ अ‍ॅनिमेशन) - आशुतोष पाठक यांचा चित्रपट

डॉगी स्टाईल हे आधुनिक मानवाचं उपहासात्मक कथानक आहे जे मानवी मूल्यांचे अनुकरण करणाऱ्या आणि अयशस्वी झालेल्या श्वानांच्या समाजाच्या दृष्टीकोनातून कथनकेले जाते. जर मानवही यशस्वी होऊ शकत नसेल तर ते खऱंच यशस्वी होऊ शकतील का? या प्रश्नाचं उत्तर या चित्रपटात शोधायची प्रयत्न होईल.

4. पिंकी प्रॉमिस (म्युझिकल कॉमेडी) - अमितोष नागपाल लिखित

हिमाचल प्रदेशातील एका छोट्या डोंगराळ गावात, पिंकी एक 'उत्साही' नृत्यांगना आणि प्रतिस्पर्धी भजन-मंडळीतील प्रतिभावान गायिका गोल्डी, स्वतःला निषिद्ध प्रेमात अडकवतात. त्यांची भांडणे असलेली कुटुंबे असूनही, ते अपेक्षा धुडकावून लावतात आणि आनंददायी संगीतमय प्रवासाला सुरुवात करतात. आधुनिक काळातील रोमियो आणि ज्युलिएट सारखी हृदयस्पर्शी कथा या चित्रपटातून मांडली जाणार आहे.

5. रियालिटी (डॉक्युमेंटरी) - राहुल सिंग दत्ता यांचा चित्रपट

लग्नाचे नियोजन, नोकरीची मागणी आणि अवघड नातेसंबंधांच्या वावटळीत पती आणि पत्नी त्यांच्या आयुष्याच्या प्रवासासाठी एकमेकांना चिकटून राहतात, अशी या चित्रपटाची कथा आहे.

6. मिस पामोलिव्ह ऑल नाईट कॅबरे (फँटसी ड्रामा) - कमल स्वरूप यांचा चित्रपट

एक क्रांतिकारी ब्रह्मचारी डाकू, भवानी सिंग आणि एक कॅबरे डान्सर, मिस पामोलिव्ह, सिनेमाच्या विलक्षण जगात एक प्लॅटोनिक संगीतमय प्रवास सुरू करतात. त्यांनी केवळ चुंबन घेतले तर तो पराभूत होऊ शकतात हा शोध सरकारला लागतो, असे या चित्रपटाचे कथानक आहे.

हेही वाचा -

  1. प्रियांका चोप्रानं शेअर केले लेकीची 'तेव्हा आणि आता'चे न पाहिलेले फोटो
  2. 'आर्टिकल ३७०' चित्रपटाने 25 कोटींचा टप्पा पार केला, विद्युत स्टारर 'क्रॅक' पिछाडीवर
  3. मुंबई विमानतळावरील सलमान खानचा छोट्या मुलांना शेकहॅन्ड करतानाचा व्हिडिओ व्हायरल

ABOUT THE AUTHOR

...view details