मुंबई - Panchayat 3 X Review : व्हायरल फीव्हर (TVF) ने आज 28 मे रोजी अमेझॉन प्राईमवर आपल्या 'पंचायत' या लोकप्रिय मालिकाचा बहुप्रतिक्षित तिसरा सीझन प्रसारित केला आहे. शेवटचा सीझन येऊन जवळपास दोन वर्षे झाली होती. तेव्हापासून या मालिकेच्या नव्या सीझनची प्रतीक्षा सुरू होती. आता ही मालिका प्रसारित झाली असून प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या पात्रांच्या जगात परत जायाला मिळालंय. विस्मयकारक नव्या कथेसह नवीन सीझन पहिल्याप्रमाणेच आकर्षक असल्याचं प्रेक्षकांना वाटतंय.
समीक्षक आणि चाहत्यांकडून या शोला खूप प्रेम आणि प्रशंसा मिळत आहे. TVF नं तयार केलेली ही नवी सामुग्री प्रेक्षकांचं उत्तम मनोरंजन करत असल्याचं दिसतंय.
पंचायतीचा सीझन 3 रिलीज झाल्यानं वेब मालिकेच्या क्षेत्रात एक नवी लाट निर्माण झाली आहे. देशा विदेशातील तमाम प्रेक्षकांची ही एक खूप आवडती OTT मालिका आहे.
प्रधान जी, मंजू देवी, सचिव जी, प्रल्हाद, विकास, बनारकस, रिंकी आणि बिनोद यांसारख्या पात्रांचा शोमध्ये पूर्ण सहभाग आहे, त्यामुळे संपूर्ण शोमध्ये भरपूर मनोरंजन होत आहे. शोला सकारात्मक समीक्षने मिळत आहेत आणि फाईव्ह स्टार रेटिंग अनेकांनी दिली आहेत.
हा शो आल्यापासून लोकांना ऑनलाइनचे वेड लागल्याचं दिसत आहे. चाहत्यांना त्याची कथा, त्यातील मजेदार भाग आणि भावनांनी भरलेले भाग आवडले आहेत. सर्व चाहते याला TVF ने बनवलेला आजवरचा एक उत्कृष्ट शो असल्याचं म्हणत आहेत.