मुंबई :अभिनेत्री रश्मिका मंदान्नाला जिममध्ये दुखापत झाल्यामुळे तिला तिच्या आगामी चित्रपटांचं शूटिंगचं वेळापत्रक तात्पुरते थांबवावे लागले आहे. आता तिनं तिच्या पायाच्या दुखापतीबद्दल एक अपडेट शेअर केली आहे. यामध्ये असं दिसून येत आहे की, ती सध्या सुट्टीच्या मूडमध्ये आहे. तिनं तिच्या दुखापतग्रस्त पायाचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यात तिनं तिच्या आगामी चित्रपट 'सिकंदर', 'थामा' आणि 'कुबेर'च्या दिग्दर्शकांची उशीराबद्दल माफी मागितली आहे. रश्मिका मंदान्नानं तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिनं तिचा जखमी पाय उशीवरवर ठेवल्याचा दिसत आहे.
रश्मिका मंदान्नाची पोस्ट :रश्मिकां तिच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, 'बरं... मला नवीन वर्षाच्या शुभेच्छा! माझ्या पवित्र जिम मंदिरात मला स्वतःला दुखापत झाली, मी पुढील काही आठवडे किंवा महिने "हॉप मोड" मध्ये आहे. आता देवालाच माहिती, की मी 'थामा', 'सिकंदर' आणि 'कुबेर'च्या सेटवर परत कधी जाईल!' माझ्या दिग्दर्शकांना उशीराबद्दल माफी मागते. मी लवकरच परत येईन. जर तुम्हाला माझी गरज भासली तर मी तुमच्या जवळ असेन.' रश्मिकानं अपडेट शेअर करताच चाहत्यांनाही तिची काळजी वाटू लागली आहे. रश्मिकाच्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. याशिवाय काही चाहत्यांनी तिला लवकर बरे होशील असं देखील म्हटलं आहे.