मुंबई - Bigg Boss OTT 3 : 'बिग बॉस ओटीटी सीझन 3' सुरू झाला आहे. यावेळी अनिल कपूर या शोला होस्ट करत आहे. अभिनेते, यूट्यूबर्स आणि मीडिया इंफ्लूएंसर्स यांच्यात ट्रॉफीसाठी शर्यत असल्याचं दिसतंय. दरम्यान अभिनेता रणवीर शौरीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात तो शोमध्ये उपस्थित असलेल्या एका यूट्यूबरला कार्टून म्हणताना दिसत आहे. आता हा व्हिडिओ पाहून चाहतेही त्याला पाठिंबा देत आहेत. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये रणवीर कुटुंबातील सदस्यांच्या योगदानाबद्दल बोलताना दिसत आहे. यानंतर तो लवकेश कटारियाबद्दल म्हणतो, "गेल्या दोन दिवसांत लवकेश या घरात विष पसरवणं आणि टोमणं मारण्याशिवाय काही योगदान देत नाही."
रणवीर शौरीचा व्हिडिओ व्हायरल : यावर लवकेश काही बोलण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा बाकी उपस्थित असलेले कलाकार त्याला कार्टून आणि शून्य असल्याचं म्हणतात. तसेच रणवीरनं पुढं म्हटलं, "बाहेरील लोकांना दाखवण्यासाठी काहीही बोलत राहतो. त्याचं योगदान शून्य आहे. या व्हिडिओला बिग बॉसच्या पेज वरून व्हिडिओ शेअर करण्यात आलं आहे. आता या व्हिडिओवर अनेकजण कमेंट्स करत आहेत. एका यूजरनं लिहिलं की, "रणवीर बरोबर आहे." दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं की, "आता घरातील लोकांनाही माहित आहे की लव कटारिया हा बॅक्टेरिया आहे." आणखी एकानं यूजरनं लिहिलं, "कार्टून एकदम परफेक्ट आहे." या व्हिडिओवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देऊन लवकेशच्या विरोधात बोलताना दिसत आहेत.