मुंबई Randeep Hooda : हिंदी चित्रपटसृष्टीचा अभिनेता रणदीप हुड्डा सध्या रिलीज झालेल्या 'स्वातंत्र्य वीर सावरकर' चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं आहे. दरम्यान बुधवारी 24 एप्रिल रोजी मुंबईतील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमात रणदीप हुड्डाला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. या पुरस्कारानं सन्मानित झाल्याबद्दल रणदीपनं म्हटल, "हा पुरस्कार माझ्यासाठी खूप खास आहे. मला अनेक दिग्गजांबरोबर सन्मानित केलं गेलं ही माझ्यासाठी एक सौभाग्याची गोष्ट आहे. सावरकर, मंगेशकर कुटुंब खूप जवळचे होते आणि या बायोपिकवर काम करणे माझ्यासाठी खूप अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट होती."
'स्वातंत्र्य वीर सावरकर' बायोपिक : 'स्वातंत्र्य वीर सावरकर' हा विनायक दामोदर सावरकर यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक असलेले स्वातंत्र्य वीर सावरकर यांनी इंग्रजांविरुद्ध कमालीची लढाई लढली होती. दरम्यान 'स्वातंत्र्य वीर सावरकर' या चित्रपटाचं दिग्दर्शन रणदीप हुड्डानं केलं आहे. याशिवाय त्यानं या चित्रपटामध्ये सावरकरांची भूमिकाही साकारली आहे. या चित्रपटामध्ये रणदीप हुड्डा, अंकिता लोखंडे आणि अमित सियाल हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसले. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 22 मार्च रोजी हिंदी आणि मराठी या दोन भाषांमध्ये प्रदर्शित झाला होता.