मुंबई Ranbir kapoor :अभिनेता रणबीर कपूर गेल्यावर्षीपासून 'ॲनिमल' चित्रपटामुळे भारतीय बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. 2023 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत 'ॲनिमल' चित्रपट आहे. रणबीरचा 'ॲनिमल' हा करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. यापूर्वी, रणबीर कपूरचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट 'संजू' होता. 'ॲनिमल' चित्रपटानं भारतीय बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करून एक इतिहास रचला आहे. चाहते आता 'ॲनिमल'च्या दुसऱ्या भागाची वाट पाहत आहेत. आता 'ॲनिमल पार्क'बद्दल एक मोठी अपडेट आली आहे. ही अपडेट वाचून कोणालाही धक्का बसू शकतो.
'ॲनिमल पार्क' रणबीर कपूर सोडणार? :रणबीर कपूर 'ॲनिमल पार्क' सोडू शकतो. अलीकडेच रणबीर कपूरची पत्नी आलिया भट्टचा 'जिगरा' चित्रपट प्रदर्शित झाला. 'जिगरा' बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरत आहे. याशिवाय टी-सीरीजचे मालक भूषण कुमारची पत्नी आणि अभिनेत्री दिव्या कुमार खोसलानं सोशल मीडियाद्वारे आलिया भट्टवर निशाना साधला आहे. 'जिगरा'च्या कमाईत अतिशयोक्ती केल्याबद्दल दिव्यानं आलियाची खरडपट्टी एका पोस्टच्या माध्यामातून काढली होती. आता दिव्याच्या या टोमण्यावर रणबीर आणि आलिया नाराज असल्याचं बोललं जात आहे. एका रिपोर्टनुसार रणबीर हा 'ॲनिमल पार्क' चित्रपट करणार नाही. 'ॲनिमल' या चित्रपटाचे निर्माते दिव्याचे पती आणि टी-सीरीजचे मालक भूषण कुमार आहेत.