महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

अमिताभ बच्चन यांच्या 'जंजीर' चित्रपटाच्या रिमेकबद्दल राम चरणचा धक्कादायक खुलासा - RAM CHARAN SHOCKING REVELATION

तेलुगू सुपरस्टार राम चरण यानं बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन यांच्या 'जंजीर' चित्रपटाच्या रिमेकबद्दल मोठा खुलासा केला आहे.

RAM CHARAN
राम चरण (राम चरण- फिल्म जंजीर पोस्टर (ANI))

By ETV Bharat Entertainment Team

Published : Jan 8, 2025, 12:35 PM IST

मुंबई - साउथ फिल्म इंडस्ट्रीचा सुपरस्टार राम चरण त्याच्या आगामी बहुप्रतिक्षित 'गेम चेंजर' चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. सध्या तो या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहे. अलीकडेच त्यानं एका मुलाखतीत अनेक प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिली. यादरम्यान त्यानं त्याच्या कारकिर्दीतील एका महत्त्वाच्या क्षणाचा खुलासा केला.

साऊथचा लोकप्रिय स्टार अभिनेता नंदामुरी बालकृष्णा यांच्या टॉक शोमध्ये राम चरण पाहुणा म्हणून सामील झाला होता. यादरम्यान त्याने कबूल केलं की मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या जंजीर चित्रपटाच्या रिमेकमध्ये काम करण्याचा त्याचा निर्णय सपशेल चुकीचा होता. त्या गोष्टीचा पश्चाताप होत असल्याचं राम चरणनं म्हटलंय. या रिमेककडून त्याला खूप अपेक्षा होत्या मात्र त्यावर पाणी फिरल्याचं तो म्हणाला. या चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादामुळे त्याच्या पदरी निराशा पडली. हा चित्रपट एकाच वेळी बॉलिवूडमध्ये एक नवीन भाषा निर्माण करण्याचा आणि प्रेक्षकांशी एकरूप होण्याचा एक प्रयत्न होता.

चर्चेमध्ये राम चरणला विचारण्यात आले की, 'त्याच्या कारकिर्दीत असा कोणता चित्रपट आहे की जो केल्याचा पश्चाताप होतो?' उत्तर देताना त्यानं जंजीर चित्रपटाचं नाव घेतलं. "जंजीर या चित्रपटाच्या रिमेकमध्ये काम केल्याबद्दल पश्चाताप होतो. ही भूमिका अगोदर अमिताभ बच्चन यांनी साकारली होती," राम चरण म्हणाला.

राम चरणनं त्याच्या अभिनयाची सुरुवात अ‍ॅक्शन फिल्म 'चिरुथा'पासून केली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. त्यानंतर एसएस राजामौली यांच्या 'मगधीरा' या चित्रपटानं त्याला तेलुगू भाषा बोलणाऱ्या प्रत्येक घरात पोहोचवलं. हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा तेलुगू चित्रपट ठरला होता. यानंतर त्यानं 'ऑरेंज', 'ऋचा', 'नायक', 'जंजीर', 'येवडू', 'गोविंदुडू अंधारीवडेले', 'ध्रुव', 'रंगस्थलम' यांसारख्या अनेक विषयावरील चित्रपटातून आपल्या अभिनयाची धार आणखी तेज बनवली. त्यानंतर 'आरआरआर' या चित्रपटानं त्याला ग्लोबल स्टार बनवलं. आजही त्याचा सिनेक्षेत्रातील दबदबा खूप मोठा आहे.

सुपरस्टार चिरंजीवीचा सुपुत्र असलेल्या राम चरणच्या बॉलिवूड एन्ट्रीसाठी 'जंजीर' या 1073 मध्ये गाजलेल्या चित्रपटाच्या रिमेकची निवड करण्यात आली होती. मूळ चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी साकारलेली एका निर्भय पोलीस अधिकाऱ्याची भूमिका राम चरण करत होता. मात्र चित्रपट रिलीज होताच राम चरणच्या अभिनयाची तुलना अमिताभ बच्चनशी सुरू झाली आणि ही तुलना कधीच बरोबरीची होऊ शकणार नव्हती. त्यामुळे या चित्रपटावर भरपूर टीका झाली होती. हा चित्रपट हिंदी आणि तेलुगू या दोन भाषांमध्ये बनवण्यात आला होता. राम चरम आणि प्रियंका व्यतिरिक्त या चित्रपटात संजय दत्त, श्रीहरी, प्रकाश राज, अतुल कुलकर्णी यांसारखे सहकलाकार होते.

राम चरण त्याच्या आगामी 'गेम चेंजर' चित्रपटात आयएएस अधिकाऱ्याची भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाला आहे. शंकर दिग्दर्शित या चित्रपटात राम चरण हा एक प्रामाणिक अधिकारी म्हणून दाखवण्यात आला आहे जो राजकीय व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी तयार आहे. या चित्रपटात कियारा अडवाणीही मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट 10 जानेवारीला मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details