महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Upasana meets President : राम चरणची पत्नी उपासना कोनिडेला यांनी घेतली राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांची भेट - Upasana Konidela meets President

Upasana Konidela meets President Murmu: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतल्यानंतर दक्षिणेतील सुपरस्टार राम चरण यांची पत्नी उपासना यांनी आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आहे. या खास भेटीचा फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Upasana Konidela meets President Murmu
उपासना कोनिडेला यांनी घेतली राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांची भेट

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 16, 2024, 5:33 PM IST

मुंबई - Upasana Konidela meets President Murmu: साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार राम चरण सध्या त्याच्या 'गेम चेंजर' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये गुंतला आहेत. त्याचबरोबर त्याची पत्नी उपासना कामिनेनी कोनिडेला याही सामाजिक कार्यात व्यग्र झाल्या आहेत. अलीकडेच त्यांनी ग्लोबल स्पिरिच्युअलिटी फेस्टिव्हलमध्ये भाग घेतला होता. या महोत्सवात उपासनाने भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. सुपरस्टारच्या पत्नीने राष्ट्रपतीं बरोबरचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

उपासना कामिनेनी कोनिडेलाने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्रामवर ग्लोबल स्पिरिच्युअलिटी फेस्टिव्हलची काही खास फोटो पोस्ट केले आहेत. पहिल्या फोटोत उपासना राष्ट्रपतींच्या बरोबर दिसत आहेत. दोन्ही महिला एकमेकांना हात जोडून अभिवादन करताना दिसत आहेत. दुसऱ्या फोटोत उपासना, अध्यात्मिक नेता आणि लेखक कमलेश डी. पटेल यांच्यासह तिच्या मुलीला मांडीवर घेऊन पोज देताना दिसत आहे. तर शेवटच्या फोटोत उपासना कोनिडेला स्टेजवरुन भाषण करताना दिसत आहेत.

फेस्टिव्हलचा फोटो शेअर करताना उपासनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'आज भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी आणि माझी मुलगी क्लिनकारा कोनिडेला यांना हार्टफुलनेस फॉर इनर अँड वर्ल्ड पीस - ग्लोबल स्पिरिच्युअलिटी फेस्टिव्हलमध्ये भेटून खूप आनंद झाला. धन्यवाद कमलेशजी, तुम्ही खरोखरच जगासाठी एक चांगले स्थान बनवले आहे. माझ्या मुलाने सर्व सकारात्मकता अनुभवावी आणि ती स्वीकारावी अशी माझी इच्छा होती.

सांस्कृतिक आणि हार्टफुलनेस मंत्रालयाने जागतिक अध्यात्म महोत्सवाचे आयोजन केले आहे. हा फेस्टिव्हल 14 जानेवारी ते 17 मार्च दरम्यान हैदराबादमधील हार्टफुलनेसचे मुख्यालय कान्हा शांती वनम येथे सुरू होईल.

तत्पूर्वी, उपासना उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर गेली होती, जिथे तिने राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही भेट घेतली. या भेटीत त्यांनी अयोध्येत अपोलो रुग्णालयाचे उद्घाटन केले आणि रामललाचेही दर्शन घेतले.

हेही वाचा -

महागड्या 4 कोटीच्या कारमधून फिरल्यानंतर कार्तिक आर्यनने का केला सायकल चालवण्याचा विचार?

Akshay and Tiger Shroff : पाहा, 'बडे मियाँ' अक्षयची 'छोटे मियाँ' टायगरशी 'अशी ही बनवाबनवी' !!

Prabhas Returns : 'कल्की 2898 एडी'च्या शुटिंगनंतर प्रभास इटलीहून मायदेशी परतला, पाहा त्याचा स्टायलिश लूक

ABOUT THE AUTHOR

...view details