मुंबई - Rakul and Jackky: हिंदी चित्रपटसृष्टीतील सुंदर अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि अभिनेता जॅकी भगनानी यांचा गेल्या महिन्यात 21 फेब्रुवारीला विवाह झाला. आता लग्नाच्या एका महिन्यानंतर जॅकीनं फर्स्ट मंथ एनिवर्सरी साजरी करत एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओच्या पोस्टमध्ये या जॅकीनं एक सुंदर कॅप्शन दिलं आहे. या पोस्टवर त्यानं लिहिलं, ''ज्या क्षणापासून आम्ही एकाच मार्गावरून चालत आलो, त्या क्षणापासून आम्ही एकमेकांचा हात धरून मिस्टर आणि मिसेस झालो आहोत.'' या प्रत्येक क्षणाला माझ्या मनात एक खास स्थान आहे. तुझ्याबरोबर एक महिना एका सेकंदासारखा गेला आहे. मी तुझ्यावर प्रेम करतो. फर्स्ट मंथ एनिवर्सरीसाठी तुला शुभेच्छा.''
रकुल प्रीत सिंगची मुलाखत : एका मुलाखतीदरम्यान रकुल प्रीत सिंगनं म्हटलं होत की, ''ही पहिली होळी असेल जी आम्ही एकत्र साजरी करू.'' लग्नानंतरचे आयुष्य आणि त्यात आलेले बदल याबद्दल बोलताना तिनं पुढं म्हटलं, ''लग्नानंतर मला काहीही बदलण्याची गरज नव्हती, हा आयुष्याचा एक सुंदर भाग आहे जो कोणासाठीही सामान्य असू शकतो. लग्नानंतर आपलं आयुष्य बदलेल असा विचार करून लोक अनेकदा घाबरतात. पण लग्नापूर्वी आणि नंतर काही फरक झालेला नाही.'' यानंतर तिनं पुढं सांगितलं होत की, ''आम्ही दोघेही एकसारखे आहोत. जवळपास 90 टक्के आमच्यात साम्य आहे.''