मुंबई Raksha Bandhan 2024 :रक्षाबंधनाच्या निमित्तानं दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मोठी बहीण, श्वेता सिंह कीर्तीला तिच्या भावाची आठवण झाली आहे. तिनं आता इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये सुशांतचे जुने फोटो आहेत. या व्हिडिओमध्ये सुशांत आणि त्याचे चाहते देखील दिसत आहेत. क्लिपचा शेवटी सुशांतच्या सोशल मीडिया पोस्टनं होते. यात लिहिलं आहे की, "कुठली गोष्ट कोणाला स्टार बनवते आणि योग्य माणूस, मला कधीच कळणार नाही." दरम्यान श्वेता सिंह कीर्तीनं शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं, "रक्षाबंधनाच्या शुभेच्छा माझ्या प्रिय भावा, तू केवळ एक महान कलाकारच नाही, तर एक महान माणूस देखील होतास. तू किती लोकांना प्रेमानं जिंकलं आहेस, मलाही तेच करायचं आहे आणि मी या गोष्टी फॉलो करत आहे."
श्वेता सिंह कीर्तीनं शेअर केला व्हिडिओ :श्वेतानं शेअर केलेल्या भावनिक पोस्टवर अनेकजण तिला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देत सांत्वना देताना दिसत आहेत. याशिवाय श्वेतानं इन्स्टाग्रामच्या स्टोरी सेक्शनमध्ये देखील एक नोट लिहिली आहे, यामध्ये तिनं लिहिलं, "माझ्या प्रिय भावाला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा, आशा आहे की तू देवाच्या सहवासात नेहमी आनंदी आणि सुरक्षित असेल." 14 जून 2020 रोजी सुशांत मुंबईतील वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळला होता. त्यानं आत्महत्या केल्याचं म्हटलं जात होतं. सुशांतचे वांद्रे येथील मॉन्ट ब्लँक अपार्टमेंटमध्ये असलेलं निवासस्थान आता 'द केरळ स्टोरी' फेम अभिनेत्री अदा शर्मानं भाड्यानं घेतलं आहे.