मुंबई - Rakhi Sawant Ex Husband Ritesh : बॉलिवूड ड्रामा क्वीन राखी सावंतला नुकतेच मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. राखी सावंतचा पहिला पती रितेश कुमार आणि तिचा भाऊ राकेश सावंत यांनी याबद्दलची माहिती दिली होती. राखीची प्रकृती अजूनही नाजूक असल्याचं रितेश कुमारनं आता सांगितलं आहे. शनिवार, 18 मे रोजी राखीवर शस्त्रक्रिया होणार असल्याचं आता समजत आहे. दरम्यानं रितेशनं आदिल दुर्रानीबद्दल आणखी एक मोठा खुलासा केला आहे, जे ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. रितेशनं एका मुलाखतीत सांगितलं की, "राखी मानसिकदृष्ट्या ठीक आहे, परंतु काही गोष्टींमुळे ती खूप अस्वस्थ झाली आहे. यामुळे तिला एकटेपणा जाणवत आहे. तिला अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहे. ती रोज रात्री उठते आणि रडायला लागते. तिला भीती वाटते की आपल्याला काहीही होऊ शकतं."
राखी सावंतच्या पहिल्या पतीनं केला खुलासा :पुढं त्यानं म्हटलं, राखीनं मला मला सांगितलं की, "जर तिला काही झालं तर आदिलला सोडू नको. तू बदला घे आणि त्याला धडा शिकव. त्याचा डोळा तिच्या मालमत्तेवर असून त्याला ते सर्व हडपायचे आहे. आता राखी खूप उदास आहे." याशिवाय त्यानं सांगितलं की, "राखी लवकरच बरी होणार आहे. तिच्या तब्येतीबद्दल जास्त बोलू शकत नाही, पण तिनं मला तिच्या आरोग्याबद्दलची अपडेट्स देण्यास सांगितलं आहे. ती हॉस्पिटलमधून बाहेर पडताच सर्व काही सांगेल. शस्त्रक्रियेनंतर, डॉक्टर ट्यूमर तिला दाखवेल. राखी सावंतला छातीत तीव्र वेदना होत असल्यानं तिला मंगळवारी रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिचे काही रुग्णालयातील फोटो समोर आले होते.