मुंबई -Rakhi Sawant : बॉलिवूड ड्रामा क्वीन राखी सावंत सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे. ती लाइमलाइटमध्ये येण्यासाठी एक संधी देखील सोडत नाही. राखीची तब्येत अचानक बिघडली, त्यानंतर तिला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. राखी सावंतला हृदयविकाराचा गंभीर आजार असल्याचं सांगण्यात येत आहे. आता तिचा भयंकर अवस्थेतील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ती हॉस्पिटलच्या बेडवर बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसत आहे. याशिवाय एक नर्स तिच्या रक्तदाब तपासताना दिसत आहे. राखीला हृदयविकाराचा गंभीर त्रास असल्याचं डॉक्टरांचं म्हणणे आहे.
राखी सावंतची तब्येत गंभीर : राखी सावंतला याआधीही अनेकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काही दिवसापूर्वी तिचे पोटाशी संबंधित ऑपरेशन करण्यात आलं होतं. राखी सावंत बराच काळ दुबईत राहून मुंबईत परतली आहे. ती तिच्या कामामुळे बराच काळ दुबईत राहते. याशिवाय ती आपले व्हिडिओ टीक टॉकवर देखील बनवताना दिसते. राखी सावंत तिच्या वादग्रस्त विधानांनी सोशल मीडियावर नेहमीच खळबळ उडवत असते. काही दिवसांपूर्वी ती 'मोहल्ला' या गाण्यात दिसली होती तिचे गाणं हे चांगलच हिट झालं होतं. राखी अनेकदा तिचा पूर्वाश्रमीचा पती रितेश कुमारबरोबर दिसतं.