महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

रजनीकांत आणि नागार्जुन एकाच चित्रपटात झळकणार? 'थलायवर 171'च्या शीर्षक लॉन्चपूर्वी चर्चेला उधाण - Thalavar 171 - THALAVAR 171

Thalavar 171 : सुपरस्टार रजनीकांतच्या आगामी 'थलायवर 171' या चित्रपटाचे निर्माते आज चित्रपटाच्या शीर्षकाचे लॉन्चिंग करण्यासाठी सज्ज झाले आहेत. 'थलायवर 171' चा टायटल टीझर रिलीज होण्यापूर्वी, चित्रपटाबद्दलची चर्चा सुरू असताना यामध्ये सुपरस्टार नागार्जुन या चित्रपटात झळकणार असल्याचीही चर्चा आहे. लोकेश कनागराज दिग्दर्शित हा चित्रपट रजनीच्या चाहत्यांसाठी मोठं आकर्षण असेल.

Rajinikanth and Nagarjuna
रजनीकांत आणि नागार्जुन

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 22, 2024, 11:30 AM IST

मुंबई- Thalavar 171 : सुपरस्टार रजनीकांतचे तमाम चाहते 'थलायवर 171' चित्रपटाच्या टायटल टीझरच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. या लॉन्चिंगला अवघे काही तास उरले असताना चाहत्यांचा उत्साह वाढला आहे. सध्या सोशल मीडियावर #Thalaivar171 सारखे हॅशटॅग आधीच ट्रेंड करत आहेत. रजनीकांत बऱ्याच काळानंतर खलनायकी भूमिकेत दिसणार असल्यामुळे या चित्रपटाभोवतीची चर्चा अधिक रंगली आहे. लोकेश कनागराज दिग्दर्शित या चित्रपटात सुपरस्टार नागार्जुन काम करत असल्याच्या अंदाज वर्तवला जात असल्यामुळे या बातमीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

कमल हासन स्टारर 'विक्रम' चित्रपटाला मिळालेल्या जबरदस्त यशानंतर दिग्दर्शक लोकेश कनागराज आणि रजनीकांत पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. आधीच्या एका मुलाखतीत, लोकेशने 'थलायवर 171' मधून काहीतरी वेगळे करण्याचा इशारा दिला होता, त्यामुळे सुपरस्टार रजनीकांतच्या चाहत्यांमध्ये प्रचंड अपेक्षा निर्माण झाली होती. शीर्षक टीझर रिलीज होण्यास काही तास बाकी आहेत, त्यामुळे केवळ रजनीकांतचे चाहतेच नव्हे तर तमाम प्रेक्षकही आतुरतेने वाट पाहत आहेत. लोकेश कनागराज दिग्दर्शित 'विक्रम'च्या या मागील शीर्षकाच्या टीझरचा प्रभाव पाहता, 'थलायवर 171' साठी अपेक्षा जास्त आहेत.

रजनीकांतसाठी 'थलायवर 171' हा चित्रपट सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक आहे. चित्रपटाविषयी मर्यादित माहिती असतानाही अलिकडे जे फिल्म इंडस्ट्रीच्या आतील बातम्यांचा विचार करता यामध्ये तेलुगू सुपरस्टार नागार्जुनला महत्त्वाची भूमिकेसाठी घेतलं जाणार आहे. या बातमीला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. याआधीच्या अहवालात असेही सुचवण्यात आले होते की या चित्रपटाचे निर्माते अभिनेत्री श्रुती हासन, ज्येष्ठ अभिनेत्री शोबाना आणि रणवीर सिंग यांच्याशी चित्रपटातील महत्त्वपूर्ण भूमिकांसाठी चर्चा करत आहेत.

सन पिक्चर्स निर्मिती करत असलेल्या 'थलायवर 171' चित्रपटाचं संगीत अनिरुद्ध रविचंदर यांचं असणार आहे. हा चित्रपट रजनीकांतच्या चित्रपट कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरु शकेल अशी त्याच्या चाहत्यांना आणि प्रेक्षकांना अपेक्षा आहे.

हेही वाचा -

  1. "यापुढं छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार नाही"; अभिनेता चिन्मय मांडलेकरनं का घेतला हा निर्णय? - Chinmay Mandalekar
  2. 'कल्की 2898 एडी'मधील नवीन प्रोमो रिलीज, अमिताभ बच्चन साकारणार अश्वत्थामाची भूमिका - amitabh bachchan
  3. बाफ्टा आणि ऑस्करनंतर 'ओपेनहाइमर' फेम स्टार सिलियन मर्फीला मिळाला आणखी एक मानाचा पुरस्कार - Cillian Murphy

ABOUT THE AUTHOR

...view details