मुंबई : आज संपूर्ण देश महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करत आहे, मग बॉलिवूड कसे मागे राहू शकते. या शुभ सणानिमित्त अमिताभ बच्चन, वरुण धवन, सुनील शेट्टी, करीना कपूर, अक्षय कुमार, महेश बाबू, अथिया शेट्टी, सोनम कपूर, अनन्या पांडे यांच्यासह अनेक स्टार्सनी सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच महाशिवरात्रीला, राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा हे देखील कुटुंबासह महादेवाचे आशीर्वाद घेण्यासाठी काशी विश्वनाथ मंदिरात गेले. राघव चढ्ढानं सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. याशिवाय त्यांनी या पवित्र सणाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
राघव-परिणीती काशी विश्वनाथला पोहोचले : शेअर केल्या पहिल्या फोटोत परिणीती आपल्या पतीसह अभी असल्याची दिसत आहे. याशिवाय दुसऱ्या फोटो पूर्ण कुटुंब या जोडप्याबरोबर आहे. फोटो शेअर करताना राघव चढ्ढानं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'जय श्री बाबा विश्वनाथ, हर हर महादेव, महाशिवरात्रीच्या सर्व देशवासियांना खूप खूप शुभेच्छा'. दुसरीकडे परिणीतीनं इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत परी आणि राघव हे दोघेही महादेवाच्या भक्तीत तल्लीन असल्याचे दिसत आहेत. पती राघवबरोबर परिणीतीनं संध्याकाळच्या आरतीचा आनंद घेतला.
राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा (raghav chadha and parineeti chopra (Instagram)) परिणीती वर्कफ्रंट : दरम्यान राघवनं पोस्ट केलेल्या फोटोंवर चाहत्यांनी खूप कमेंट केल्या आहेत. एकानं या पोस्टवर लिहिलं, 'बाबांचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमीच राहो'. दुसऱ्या एकानं लिहिलं 'तुमचे बंधन आणि प्रेम भोलेनाथ आणि पार्वतीसारखे अतूट राहो.' तसेच परिणीती आणि राघवबद्दल बोलायचं झालं तर ते शेवटी रजत शर्माच्या 'आप की अदालत' या शोमध्ये दिसले होते. या जोडप्यानं 13 मे 2023 रोजी साखरपुडा केला होता. यानंतर त्यांनी वर्षी 24 सप्टेंबर रोजी लग्न केलं. या जोडप्याचं लग्न खूप चर्चेत होतं. तसेच परिणीतीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती शेवटी 'अमर सिंह चमकिला' या चित्रपटात दिसली होती. यामध्ये तिच्याबरोबर दिलजीत दोसांझ होता आणि हा चित्रपट इम्तियाज अली यांनी दिग्दर्शित केला होता. 'अमर सिंह चमकिला' चित्रपटात दिलजीतनं पंजाबचे गायक आणि संगीतकार अमर सिंह चमकिला यांची भूमिका साकारली होती. दुसरीकडे परिणीतीनं त्यांची पत्नी अमरजौत कौरची भूमिका केली होती.
हेही वाचा :
- खासदार राघव चढ्ढा शिर्डीत साईचरणी नतमस्तक; पाहा व्हिडिओ
- बर्थडे गर्ल परिणीतीला प्रियांका चोप्रासह राघव चढ्ढा यांनी दिल्या शुभेच्छा, पोस्ट व्हायरल
- लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त परिणीती चोप्रा राघव चढ्ढा यांना कुटुंबियांनी दिल्या शुभेच्छा - Wedding Anniversary