महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

लग्नानंतर अंबानी कुटुंबानं पहिल्यांदाच धाकटी सून राधिका मर्चंटचा वाढदिवस केला साजरा... - RADHIKA MERCHANT AMBANI BIRTHDAY

लग्नानंतर राधिका मर्चंट अंबानीनं 17 ऑक्टोबरला तिचा वाढदिवस साजरा केला. या पार्टीला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

Radhika Merchant birthday
राधिका मर्चंटचा वाढदिवस (राधिकाची बर्थडे पार्टी (ANI))

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 18, 2024, 10:15 AM IST

मुंबई: अंबानी कुटुंबाची सून राधिका मर्चंटनं 17 ऑक्टोबर रोजी लग्नानंतरचा पहिला वाढदिवस साजरा केला. अंबानी कुटुंबानं आपल्या कुटुंबातील सर्वात लहान सुनेचा वाढदिवस मोठ्या थाटात केला. राधिकाच्या ग्रँड पार्टीमधील अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या वाढदिवसाच्या पार्टीला बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची मुले सुहाना खान आणि आर्यन खान, अभिनेता अर्जुन कपूर, रणवीर सिंग, अभिनेत्री जान्हवी कपूर, शिखर पहाडिया अनन्या पांडे, खुशी कपूर यांच्यासह अनेक नामांकित व्यक्तींनी हजेरी लावली होती. याशिवाय दिग्गज क्रिकेटर महेंद्रसिंग धोनीचेही या पार्टीतून फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहे.

राधिका मर्चंटनं केला वाढदिवस साजरा : या पार्टीत बर्थडे गर्ल राधिकानं तिच्या जबरदस्त फॅशननं सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सोशल मीडिया इन्फ्लूएंसर ओरीनं त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर वाढदिवसामधील पार्टीची झलक शेअर केली आहे. राधिका मर्चंटच्या वाढदिवसाची पार्टी भव्य झाली. एका व्हिडिओमध्ये राधिका आणि तिचा पती अनंत अंबानीसह वाढदिवसाचा केक कापताना दिसत आहेत. दरम्यान राधिकाच्या लूकबद्दल बोलायचं झालं तर या पोर्टीमध्ये तिनं बॅकलेस पांढरा सिल्क हॉल्टर-नेक टॉपसह लाल रंगाचा लांब स्कर्ट घातला होता. दुसरीकडे अनंतनं काळ्या आणि तपकिरी रंगाचा चेक शर्ट आणि काळी पँट घातली होती.

राधिका मर्चंटचा वाढदिवस (ओरी (Instagram))
राधिका मर्चंटचा वाढदिवस (ओरी (Instagram))
राधिका मर्चंटचा वाढदिवस (ओरी (Instagram))
राधिका मर्चंटचा वाढदिवस (ओरी (Instagram))

ओरीचे काढले सेलिब्रिटींबरोबर फोटो :राधिका मर्चंट एन्कोर हेल्थकेअरचे सीईओ वीरेन मर्चंट आणि शैला मर्चंट यांची सर्वात लहान मुलगी आहे. राधिका आणि अनंत यांनी 12 जुलै रोजी मुंबईत हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केलं. भव्य विवाहानंतर 13 जुलै रोजी 'शुभ आशीर्वाद' सोहळा पार पडला, यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अनेक मान्यवर हजर होते. यानंतर 14 जुलै रोजी झालेल्या भव्य रिसेप्शनला मनोरंजन क्षेत्रातील व्यक्तींनी हजेरी लावली होती. अंबानी कुटुंबानं राधिका मर्चंट आणि अनंत अंबानीचं लग्न खूप थाटात केलं होतं. या लग्नामध्ये परदेशामधून देखील पाहूणे आले होते.

हेही वाचा :

  1. मुकेश अंबानी यांनी दीपिका पदुकोणच्या बाळाला पाहण्यासाठी हॉस्पिटलला दिली भेट, व्हिडिओ व्हायरल - Deepika Padukone and Mukesh Ambani
  2. लालबागच्या राजाच्या मंडळात 'या' पदावर अनंत अंबानी यांची नियुक्ती - Anant Ambani
  3. अनंत आणि राधिका कुटुंबासह पॅरिस ऑलिम्पिक गेम्स पाहण्यासाठी गेले, व्हिडिओ व्हायरल - Paris Olympics 2024

ABOUT THE AUTHOR

...view details