मुंबई - R Madhavan Birthday : बॉलिवूड स्टार आर माधवन साऊथ फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित असूनही हिंदी पट्ट्यातील प्रेक्षकांच्या मनावर दीर्घकाळ राज्य करणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. आज आर माधवनचा ५४ वा वाढदिवस साजरा होत आहे. यानिमित्तानं त्याच्यावर चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. माधवननं बॉलिवूडमध्ये स्वत:च्या बळावर एक स्थान निर्माण केलं आहे आणि त्याच्या अभिनयातही तो मागे नाही. या खास प्रसंगी आम्ही माधवनच्या फिल्मी करिअरबद्दल, टॉप चित्रपट आणि गाणी आणि आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलणार आहोत.
आर माधवनचा प्रेरणादायी प्रवास
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटंल की आर माधवनचा जन्म बिहारच्या जमशेदपूरमध्ये झाला होता. येथे त्याचे वडील रंगनाथन टाटा स्टीलमध्ये व्यवस्थापन अधिकारी होते आणि त्याची आई सरोजा बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापक होत्या. माधवन शाळा आणि महाविद्यालयात अव्वल ठरला आहे.
तो एनसीसीचा सक्रिय कॅडेट आहे. त्याला आर्मीमध्ये भरती व्हायचं होतं आणि त्यासाठी त्यानं इंग्लंडला जाऊन रॉयल आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्सचे प्रशिक्षण घेतलं होतं. यानंतर, तो कोल्हापुरातील राजाराम महाविद्यालयात उच्च शिक्षणासाठी दाखल झाला. या शहरात त्यानं विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण वर्गही चालवले. यादरम्यान त्याची कोल्हापुरातील सरिता बिर्जे या तरुणीशी ओळख झालं आणि त्याचं रुपांतर प्रेमात आणि पुढे लग्नात झालं.
चित्रपटात संधी कुठे मिळाली?
1998 मध्ये त्यानं 'शांती शांती शांती' या कन्नड चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं आणि त्याच वर्षी त्यानं 'इंफर्नो' या इंग्रजी चित्रपटात काम केलं. तेव्हापासून तो आजतागायत एकापाठोपाठ एक हिट चित्रपट देत आला आहे. आर माधवननं दिग्दर्शित केलेला 'रॉकेट्री-द नंबी इफेक्ट' हा पदार्पणाचा दिग्दर्शकीय चित्रपट सुपरहिट ठरला होता.
आर माधवनचे हे टॉप चित्रपट जरुर पाहा
- रॉकेट्री-द नम्बी इफेक्ट
- 3 इडियट
- तनु वेड्स मनू
- रहना है तेरे दिल में
- विक्रम वेदा
- शैतान
आर माधवनच्या टॉप वेब-सिरीज
- डिकपल्ड
- द रेलवे मॅनद रेलवे मॅन
- ब्रीथ
डिकपल्ड
'डिकपल्ड' ही एक रोमँटिक कॉमेडी मालिका भारतातील टॉपच्या मालिकांच्या यादीत समाविष्ट आहे. ही सीरिज नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. आर. माधवन आणि सुर्वीन चावला हे एक विवाहित जोडपे म्हणून, पार्टी देऊन घटस्फोटाची घोषणा करतात. ही एक रंजक मालिका अवश्य पाहण्यासारखी आहे.