मुंबई :अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदान्ना स्टारर चित्रपट 'पुष्पा 2: द रुल' बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होऊन 27 दिवस झाले आहेत. या चित्रपटानं आतापर्यंत अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले आहेत. हा चित्रपट अजूनही थिएटरमध्ये धमाकेदार कमाई करत आहेत. बॉक्स ऑफिसवर 'मुफासा,' 'मार्को', 'मॅक्स', 'वनवास' आणि 'बेबी जॉन' यासारखे अनेक नवीन चित्रपटांच्या रिलीजबरोबर 'पुष्पा 2' स्पर्धा करत आहे. गेल्या दोन दिवसांपासून 'पुष्पा 2: द रुल'च्या कमाईत घसरण आली आहे. चौथ्या आठवड्यात सुकुमार दिग्दर्शित हा चित्रपट सिंगल डिजिटमध्ये कमाई करत आहे.
'पुष्पा 2: द रुल'चं कलेक्शन : सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, चौथ्या आठवड्यात 'पुष्पा 2'च्या कलेक्शनमध्ये थोडीशी घट झाली आहे. चौथ्या रविवारनंतर सोमवारी या चित्रपटानं कमी कमाई केली. यानंतर 26व्या दिवशी 'पुष्पा 2'नं 6.8 कोटीचा व्यवसाय बॉक्स ऑफिसवर केला होता. ही आतापर्यंतची सर्वात कमी कमाई आहे. दरम्यान 27व्या दिवशी अल्लू अर्जुन स्टारर या चित्रपटानं सर्व भाषांमध्ये 7.65 कोटी रुपयांचं कलेक्शन केलं. 'पुष्पा 2'चं 27 दिवसांनंतर एकूण कलेक्शन 1171.45 कोटी झालंय. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोटींमध्ये कमाई करत आहे.