मुंबई :अभिनेता अल्लू अर्जुनचा ॲक्शन थ्रिलर चित्रपट 'पुष्पा 2' जगभरात बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट सलग 2 आठवड्यापासून बॉक्स ऑफिसवर विक्रम करत आहे. 'पुष्पा 2' चित्रपट तिसऱ्या आठवड्यातही रुपेरी पडद्यावर झपाट्यानं कमाई करत आहे. सुकुमार दिग्दर्शित हा चित्रपट भारतीय बॉक्स ऑफिसवर 1100 कोटींच्या कमाईच्या दिशेनं वाटचाल करत आहे. जगभरात या चित्रपटानं 1600 कोटी रुपयांचा आकडा गाठला आहे.
'पुष्पा 2'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 19 : सॅकनील्कच्या रिपोर्टनुसार, 5 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या 'पुष्पा 2'ची कमाई भारतात सुमारे 20 कोटींची झाली. 18व्या दिवशी अल्लू अर्जुन स्टारर चित्रपटानं 32.95 कोटी रुपयांची कमाई केली होती. याशिवाय तिसऱ्या सोमवारी 'पुष्पा 2'नं भारतात 12.25 कोटींची कमाई केली. 19व्या दिवशी देखील, 'पुष्पा 2'नं हिंदी पट्ट्यात तेलुगू आवृत्तीपेक्षा खूपच चांगली कामगिरी केली आहे. 23 डिसेंबर रोजी, 'पुष्पा 2'नं भारतात हिंदी बॉक्स ऑफिसवर 9.75 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. तर तेलुगूमध्ये 2.2 कोटींची कमाई केली. याशिवाय 'पुष्पा 2' चित्रपटानं 19 दिवसांत सर्व भाषांमध्ये 1074.85 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
'पुष्पा 2'चं हिंदी बॉक्स ऑफिस कलेक्शन :'पुष्पा 2'नं हिंदी बॉक्स ऑफिसवर 700 कोटींचा टप्पा पार केला आहे. रिपोर्टनुसार, या चित्रपटानं 17व्या दिवशी 20 कोटी रुपये आणि 18व्या दिवशी 26.75 कोटी रुपयांची कमाई केली होती. दरम्यान 19 दिवसांनंतर 'पुष्पा 2'नं हिंदी पट्ट्यात एकूण 701.5 कोटींचा व्यवसाय केला आहे. 'पुष्पा 2' 1600 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाल्यानंतर अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यामातून आपला आनंद व्यक्त करताना दिसत आहेत. 'पुष्पा 2: द रुल' तेलुगू, हिंदी, तमिळ, मल्याळम, कन्नड, बंगाली यासह अनेक भाषांमध्ये चांगली कामगिरी करत आहे. दरम्यान अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल यांचा अभिनय अनेकांना पसंत पडला आहे.
'पुष्पा 2' बॉक्स ऑफिस वीकेंड कमाई
पहिला आठवडा - 725.8 कोटी