मुंबई : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीतील सेलिब्रिटी ख्रिसमस साजरा करत आहेत. सेलिब्रिटींनी त्यांच्या ख्रिसमसच्या सेलिब्रेशनची झलक आता त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केली आहे. बहुतेक सेलिब्रिटींनी आपल्या मुलांसाठी सुंदर सजावट करून ख्रिसमसचा सण घरी साजरा केला आहे. याशिवाय काही स्टार्सनं सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी सांता आल्यानंतर तिनं सोशल मीडियावर चाहत्यांबरोबर झलक शेअर केली होती. आता करण सिंग ग्रोव्हर स्वतःच आपल्या मुलीसाठी सांता बनला आहे. करण ग्रोव्हर आणि बिपाशा बसूनं काही सुंदर व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत.
बिपाशा बसूनं साजरा केला ख्रिसमस : करण सिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बसूनं आपल्या मुलीबरोबर नाताळ साजरा केला. बिपाशा बसूची मुलगी देवीनं ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी सुंदर लाल रंगाचा ड्रेस परिधान केला होता. यामध्ये ती खूप गोंडस दिसत होती. दरम्यान या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये बिपाशानं लिहिलं की, 'पॉऊट गेम मम्मा आणि पापासारखा मजबूत'. आणखी एका व्हिडिओमध्ये करण सिंग ग्रोव्हर स्वत: देवीसाठी सांता बनून तिला भेटवस्तू देताना दिसत आहे. देवी तिच्या वडीलांना सांता बनून पाहून आनंदी होत आहे. दरम्यान दुसऱ्या एका पोस्टमध्ये बिपाशानं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'हा या वर्षातील सर्वात सुंदर काळ आहे.' आता बिपाशानं शेअर केलेल्या व्हिडिओवर अनेकजण देवीचे कौतुक आणि त्यांच्या कुटुंबाला नाताळच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत.
स्टार्सनं साजरा केला ख्रिसमस : दुसरीकडे नुसरत भरुचानं काही मुलांबरोबर ख्रिसमस साजरा केला आहे. आता तिनं तिच्या इंस्टास्टोरीवर काही व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती मुलांबरोबर नाचताना आणि गाताना दिसत आहे. यावेळी नुसरतनं काळ्या रंगाचे टी-शर्ट आणि पांढऱ्या रंगाचा जीन्स परिधान केला होता. यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती. तसेच तिनं मुलांबरोबरचा एक फोटो शेअर करत सर्वांन ख्रिसमसच्या शुभेच्छा चाहत्यांना दिल्या आहेत. याशिवाय सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटींनी देखील आपल्या चाहत्यांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान महेश बाबूनं ख्रिसमसच्या शुभेच्छा देताना पोस्टमध्ये लिहिलं, 'मेरी ख्रिसमस, तुमच्या सुट्टीचा काळ आनंदानं आणि मजेत जावो'. यासोबतच अक्षय कुमार, अनुष्का शर्मा, अर्जुन कपूर, कपिल शर्मा, दुल्कर सलमान, रणदीप हुड्डा, सोहा अली खान यांनीही त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर सर्वांना मेरी ख्रिसमसच्या खास दिवसावर चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा :