महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

पुनीत सुपरस्टारची विमानातून उतरताच धुलाई, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल - PUNEET SUPERSTAR SLAPPED

बिग बॉस ओटीटी फेम पुनीत सुपरस्टारला मारहाण झाल्याचा व्हिडिओ व्हायर झाला आहे. हा व्हिडिओ स्क्रिप्टेड असल्याचं काही नेटिझन्सना वाटत आहे.

Puneet Superstar slapped
पुनीत सुपरस्टारला मारहण (Viral video grab)

By ETV Bharat Entertainment Team

Published : 5 hours ago

मुंबई - इंटरनेटवर अनेक मार्गानं प्रसिद्ध होणाऱ्या व्यक्तीमध्ये पुनीत सुपरस्टारचं नाव आहे. त्याच्या इन्स्टाग्राम, एक्स अशा सोशल मीडिया हँडलवर तो चकित करणारे व्हिडिओ बनवत असतो. असे व्हिडिओ बनवताना तो अनेक लोकांना छेडतही असतो. गेल्या महिन्यातही त्याला मारहाण झाली होती. आता त्याचा आणखी एक मार खातानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये तो विमानातून उतरत असताना दिसतो. तो शिडीवरुन बाहेर येताच एक व्यक्ती त्याची कॉलर पकडते आणि त्याला मारहण सुरू करते.

अरहंत शेल्बी या व्यक्तीनं त्याच्या एक्स हँडलवर ही व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे. यामध्ये आपण पुनीतला एक अनोळखी व्यक्ती ठोसे मारताना दिसत आहे. पुनीत त्याचा ठोसा चुकवत माफी मागताना दिसत आहे. या अगोदर गेल्या महिन्यात त्यानं सोशल मीडियामध्ये प्रभावशाली असलेल्या प्रदीप ढाका यानं त्याचा ब्रँडची फसवणूक केल्याबद्दल मारहाण केली होती. त्या मारहणीचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. या व्हिडिओतही त्याला लाथा आणि बुक्क्यांनी मार बसला होता.

पुनीत सुपरस्टारचे सोशल मीडियावर भरपूर चाहते आहेत. त्यांना हा व्हिडिओ स्क्रिप्टेड असल्याचं वाटतंय. तर ज्या प्रकारे त्याला थप्पड मारली जात आहे त्यावरुन हा व्हिडिओ स्क्रिप्टेड नसल्याचाही अनेकजण दावा करत आहेत. लोकप्रिय होण्यासाठी पुनीत सुपरस्टार काही करु शकतो असा सूरही काही नेटिझन्सनी आळवला आहे. विमानतळावर मारहाण करणं हा गंभीर गुन्हा होऊ शकतो. तरीही हा प्रकार घडल्यामुळं अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय. तो कसाही असला तरी त्याला इजा पोहोचवणं किंवा मारहाण करणं याचं समर्थन होऊ शकत नाही असंही अनेक नेटिझन्सना वाटतंय.

ABOUT THE AUTHOR

...view details