मुंबई - Pulkit And Kriti Wedding :अभिनेता पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा 13 मार्च 2024 रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत हे जोडपे सात फेरे घेतील. या जोडप्यानं अद्याप त्यांच्या लग्नाबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही. दरम्यान, पुलकितच्या घरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा यांच्या लग्नाबद्दल अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा सुरू होत्या. या जोडप्याच्या घरात लग्नाच्या जोरदार तयारी सुरू आहेत.
पुलकित आणि क्रितीचं लग्न : आता व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पुलकितचे मुंबईतील घर दिव्यांनी सजलेले दिसत आहे. या जोडप्याच्या लग्नाच्या उत्सवाची सुरुवात झाली आहे. पुलकित आणि क्रिती हरियाणातील मानेसर येथील आईटीसी ग्रैंड भारतमध्ये सात फेरे घेणार असल्याचं समजत आहे. अलीकडेच या जोडप्याच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. हे व्हायरल कार्ड अॅनिमेशनवर आधारित होत. या कार्डवर एक मुलगा बाल्कनीत गिटार घेऊन बसलेला होता. या मुलाबरोबर एक मुलगीही तिथे बसलेली दिसत होती. हे दोघेही समुद्राकडे बघत होते. याशिवाय कार्डमध्ये दोन श्वानही होते. पुलकित आणि क्रितीच्या लग्नाचं कार्ड हे थोड वेगळे आणि हटके आहे.