मुंबई - Pulkit Samrat and Kriti Kharbanda : अभिनेत्री क्रिती खरबंदा आणि अभिनेता पुलकित सम्राट लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. या जोडप्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये दोघांच्या बोटात कपल रिंग दिसत आहे. आता त्याच्या या व्हायरल झालेल्या फोटोमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. रिया लुथरा नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पुलकित आणि क्रितीच्या रोका सेरेमनीचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. या फोटोंमध्ये हे कपल त्यांच्या खास मित्रांसोबत दिसत आहे. क्रितीनं गोल्डन बॉर्डर असलेल्या रॉयल ब्लू कलरच्या अनारकली ड्रेस परिधान केला आहे. यावर तिनं केसं मोकळे सोडले आहेत. याशिवाय तिनं सोनरी मोजडीनं तिचा लूक पूर्ण केला आहे.
पुलकित आणि क्रितीचं लग्न :दुसरीकडे पुलकितबद्दल बोलायचं झालं तर, त्यानं फ्लोरल प्रिंट व्हाइट कुर्ता परिधान केला आहे. या फोटोंमध्ये दोघांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये पुलकित हा क्रितीला मीठी मारून उभा आहे. पहिल्या फोटोंमध्ये हे जोडपे मित्र आणि कुटुंबासोबत पोझ देताना दिसत आहे. रोका समारंभाच्या या व्हायरल फोटोंवर अद्याप या जोडप्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही, परंतु हे फोटो सिद्ध करतात की, हे जोडपे लवकरच लग्न करणार आहे. पुलकितचं हे दुसरे आणि क्रितीचं पहिलं लग्न असेल. पुलकित सम्राटचं पहिलं लग्न 2014 रोजी सलमान खानची जवळची बहीण श्वेता रोहिरासोबत झालं होतं.