मुंबई - Pulkit And Kriti Wedding : अभिनेता पुलकित सम्राट लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. पुलकित अभिनेत्री क्रिती खरबंदाबरोबर गुरुग्राममधील आयटीसी ग्रँड भारत (मानेसर) येथे लग्न करणार आहे. पुलकित-क्रितीचे लग्न 15 मार्चला होणार आहे. या जोडप्याचा विवाहसोहळा आज 13 मार्चपासून सुरू झाला आहे. आता पुलकित दिल्लीतील घरातून लग्नासाठी रवाना झाला आहे. आता लग्नामधील खास कार्यक्रमासाठी त्यानं पिवळा कुर्ता आणि पांढरा पायजमा घातला आहे. आता यावरून स्पष्ट होत आहे की, आज पुलकित-क्रितीचा हळदी समारंभ होईल. घरातून बाहेर पडताच तो त्याच्या पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये बसला आणि गोड हसला.
पुलकित सम्राटचा लूक : पुलकितनं त्याच्या पोशाखावर काळ्या रंगाचा चष्माही लावला आहे. या लूकमध्ये तो खूप देखणा दिसत आहे. याआधी, पुलकित-क्रितीच्या लग्नाच्या ठिकाणाहून एक व्हिडिओ देखील आला होता, ज्यामध्ये हे जोडपे आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात एका विशेष ठिकाणावर करणार असल्याचं दाखविण्यात आलं होतं. आज या जोडप्याच्या मेहंदीबरोबर हळदीचा विधीही होणार असल्याचं समजत आहे. 14 मार्च रोजी या जोडप्याचा संगीत सोहळा होईल. यानंतर कपलसाठी कॉकटेल पार्टीही होणार आहे. दुसऱ्या दिवशी 15 मार्चला हे जोडपे लग्नबंधनात अडकणार आहेत. पुलकित आणि क्रितीच्या लग्नात कोणते स्टार्स हजर राहणार आहेत, याची कोणतीही माहिती या जोडप्यानं शेअर केलेली नाही.