मुंबई - Priyanka Chopra Wishes Kareena Kapoor Khan: युनिसेफ इंडियानं शनिवारी बॉलिवूड स्टार करीना कपूर खानला नेशनल ॲम्बेसेडर म्हणून घोषित केलं आहे. आता करीनाला अनेकजण शुभेच्छा देत आहेत. दरम्यान अभिनेत्री प्रियांका चोप्रानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून तिला शुभेच्छा दिल्या आहेत. प्रियांकानं या पोस्टवर लिहिलं, "परिवारात आपले स्वागत आहे, तू यासाठी पात्र आहेस." यानंतर करीनानं पोस्टवर लिहिलं, "धन्यवाद प्रियांका, लवकरच भेटू." करीना 2014 पासून युनिसेफ इंडियाशी जोडली गेलेली आहे. तिनं मुलींचे शिक्षण, लैंगिक समानता, मूलभूत शिक्षण, लसीकरण आणि स्तनपान यांसारख्या विषयांवर काम केलं आहे.
करीना कपूरनं शेअर केली पोस्ट :याशिवाय करीना देखील एक फोटो शेअर करत या पोस्टवर लिहिलं, "4/5/2024, माझ्या आयुष्यातील भावनिक दिवस, मला युनिसेफकडून हा विशेष सन्मान मिळाला. मी 10 वर्षांपासून या संस्थेशी संलग्न आहे. या 10 वर्षांत मी मुलांच्या हक्कांसाठी काम केलं आहे. भविष्यातही मी या संस्थेशी पूर्ण निष्ठेनं जोडून राहीन. आम्ही आतापर्यंत केलेल्या कामाचा मला खूप अभिमान आहे. मी अजूनही मुलांच्या हक्कांसाठी वचनबद्ध आहे आणि भविष्यातही त्यांच्यासाठी काम करत राहीन. याशिवाय मी माझ्या संपूर्ण टीमचे विशेष आभार मानू इच्छितो. तुम्ही लोक महिला आणि मुलांच्या हक्कांसाठी अथक प्रयत्न करत आहात. फोटोंव्यतिरिक्त, करिनानं एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. यामध्ये ती भाषण करताना भावूक होताना दिसत आहे."