महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Priyanka Chopra : प्रियांका चोप्रानं निक जोनास आणि मालतीबरोबरचे दुबई व्हॅकेशन फोटो आणि व्हिडिओ केले शेअर - Priyanka Chopra

Priyanka Chopra : अभिनेत्री प्रियांका चोप्रानं तिच्या दुबई व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती आपल्या कुटुंबाबरोबर सुंदर वेळ घालवताना दिसत आहे.

Priyanka Chopra
प्रियांका चोप्रा

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 19, 2024, 2:35 PM IST

मुंबई -Priyanka Chopra : हिंदी चित्रपटसृष्टीची 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा सध्या मायदेशी म्हणजेच तिच्या आईच्या घरी आली आहे. प्रियांका चोप्रा ईशा अंबानीच्या होळी पार्टीला सहभागी होण्यासाठी भारतात आली होती. आता ती मोठ्या सुट्टीवर असल्याचं समजत आहे. याशिवाय काल 18 मार्च रोजी तिचा पती निक जोनास देखील भारतात आला आहे. प्रियांका 18 मार्च रोजी संध्याकाळी पतीबरोबर फरहान अख्तरच्या घरी दिसली. आता यावेळचे 'देसी गर्ल'चे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये प्रियांका निकबरोबर कारमध्ये बसलेली दिसत आहे. दरम्यान प्रियांकानं नुकतेच सोशल मीडियावर दुबईच्या सुट्टीतील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

प्रियांका चोप्रा कुटुंबासह दुबईत सुट्टी घालवली : प्रियांका चोप्रा आपल्या चित्रपटांच्या कामाबरोबर कुटुंबालाही वेळ द्यायला विसरत नाही. प्रियांकाचा पती निक जोनासबरोबर खूप आनंदी आहे आणि ती आता तिच्या आयुष्यमधील छान वेळ जगत आहे. दरम्यान 'देसी गर्ल' तिची लाडकी मुलगी मालती मेरी चोप्रा जोनासचे देखील ती फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्या प्रियांका भारतात कुटुंबाबरोबर तिचा वेळ घालवत आहे. प्रियांकानं शेअर केल्या पहिल्या फोटोमध्ये ती निकबरोबर बसून दिसत आहे. दुसऱ्या फोटोत प्रियांका चोप्रा आपल्या मुलीबरोबर समुद्राच्या मध्यभागी खेळताना दिसत आहे. तिसरा व्हिडिओ आहे, ज्यामध्ये मालती दुबई बीचवर मस्ती करताना दिसत आहे. चौथ्या फोटो निकचा आहे. शेवटच्या फोटोत प्रियांका चोप्राच्या पायाची झलक दिसत आहे.

प्रियांका चोप्रा 'जी ले जरा'मध्ये दिसणार : प्रियांका चोप्राने दिग्दर्शक फरहान अख्तरच्या घरी भेट दिली म्हणजे ती 'जी ले जरा' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात प्रियांका चोप्रा व्यतिरिक्त आलिया भट्ट आणि कतरिना कैफ देखील दिसणार आहे. ग्लोबल स्टार 'देसी गर्ल' प्रियांका चोप्राचा नुकताच एक विमातळावरील व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ती मालतीबरोबर दिसली होती. दरम्यान, प्रियांका चोप्रा वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती यापुढं कल्पना चावलाच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. Vedaa teaser released : जॉन अब्राहम, शर्वरी वाघ, तमन्ना भाटिया स्टारर 'वेदा'चा टीझर रिलीज
  2. एल्विश यादवच्या आईच्या डोळ्यात अश्रू ; व्हिडिओ व्हायरल
  3. Shraddha Kapoor : श्रद्धा कपूरला लागली भूक, मागितला फ्री पिझ्झा

ABOUT THE AUTHOR

...view details