मुंबई - Bipasha Basu Pride of Bengal :अभिनेत्री बिपाशा बसू सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अनेकदा ती आपल्या पती आणि मुलीसह सुंदर फोटो चाहत्यांबरोबर शेअर करत असते. दरम्यान अलीकडेच तिनं एका पुरस्कार सोहळ्यामधील काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. बिपाशाला यंग लीडर्स फोरमतर्फे प्राईड ऑफ बंगाल पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. रविवारी 21 एप्रिल रोजी बिपाशानं प्राइड ऑफ बंगाल फंक्शनमधील काही फोटो शेअर करत लिहिलं, 'या सन्मानासाठी धन्यवाद प्राइड ऑफ बंगाल.' फोटोमध्ये बिपाशा ही काही लोकांबरोबर पोझ देत आहे.
बिपाशा बसूला मिळाला प्राईड ऑफ बंगालचा पुरस्कार :आता बिपाशाला प्राइड ऑफ बंगालच्या आयकॉनिक लेडी श्रेणीसाठी पुरस्कार मिळाल्यानंतर तिचे चाहते खूप खुश आहेत. बिपाशाच्या व्हायरल व्हिडिओवर अनेकजण कमेंट्स करून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. एका चाहत्यानं या व्हिडिओवर लिहिलं, "अभिनंदन बिपाशा तुझ्यावर मला खूप अभिमान आहे, अशीच प्रगती करत राहा." दुसऱ्या एकानं लिहिलं,"बॉलिवूडमधील सर्वात सुंदर कलाकार." आणखी एकानं लिहिलं, "बिपाशाला कुठल्या चित्रपटासाठी पुरस्कार मिळत आहे." याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी शेअर करत आहेत.