अमरावती Tirupati Prasad Row Pawan Kalyan Atonement : आंध्रप्रदेशातील तिरुपतीस्थित श्री व्यंकटेश्वर मंदिरामध्ये प्रसाद म्हणून वाटप केल्या जाणाऱ्या लाडूच्या नमुन्यामध्ये निकृष्ट दर्जाचे तूप आणि प्राण्यांची चरबी आढळल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर सर्वत्र एकच खबळबळ उडाली. या प्रकरणी माजी मुख्यमंत्री आणि वायएसआरसीपीचे अध्यक्ष जगन मोहन रेड्डी यांच्यावर आरोप केला जात आहे. यामुळं आंध्रप्रदेशचं राजकारण तापलंय. त्यातच आता आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि अभिनेते पवन कल्याण यांनी प्रायश्चित करण्याचा निर्णय घेतलाय.
"मी प्रसादाच्या लाडूमधील भेसळ रोखू शकलो नाही. त्यामुळं मला विश्वासघात झाल्यासारखं वाटतंय. यासाठी मी 11 दिवसांचा उपवास करून प्रायश्चित करतोय," असं पवन कल्याण एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहेत.
हमारी संस्कृति, आस्था, विश्वास और श्रद्धा की धर्मधुरी, श्री तिरुपति बालाजी धाम के प्रसाद में, कुत्सित प्रयासों के तहत, जो अपवित्रता का, संचार करने की कोशिश की गई, उससे मैं व्यक्तिगत स्तर पर, अत्यंत मर्माहत हूँ, और सच कहूं तो, अंदर से अत्यंत छला गया, महसूस कर रहा हूँ। प्रभु…
— Pawan Kalyan (@PawanKalyan) September 21, 2024
पोस्टमध्ये नेमकं काय म्हणालेत पवन कल्याण? : "आपली संस्कृती आणि श्रद्धा याचं केंद्रस्थान असलेल्या श्री तिरुपती बालाजी मंदिरात घडलेल्या घटनेमुळं मी वैयक्तिक पातळीवर खूप दुखावलोय. खरं सांगायचं तर, मला विश्वासघात झाल्यासारखं वाटतंय. मी भगवान व्यंकटेश्वराला प्रार्थना करतो की, तुमच्या अपार कृपेनं आम्हाला या दुःखाच्या क्षणी शक्ती प्रदान करा. सध्या, याच क्षणी, मी देवाकडे क्षमा मागतोय. प्रायश्चित्त आरंभ करण्याचं व्रत करत आहे. मी अकरा दिवस उपवास करण्याचा संकल्प केलाय. अकरा दिवसांच्या प्रायश्चित्त दीक्षेच्या उत्तरार्धात, 1 आणि 2 ऑक्टोबर रोजी मी तिरुपतीला जाईन. देवाचं दर्शन घेईन. त्यांना क्षमा मागेन. त्यानंतर माझी प्रायश्चित्त दीक्षा देवासमोर पूर्ण होईल."
पापं धुवून काढण्यासाठी मला शक्ती द्यावी- पुढं ते म्हणाले. "मी देवाकडं याचना करतो की, पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी तुमच्याविरुद्ध केलेली पापं धुवून काढण्यासाठी मला शक्ती द्यावी. देवावर विश्वास नसलेले आणि पापाची भीती नसलेले लोकच असे गुन्हे करतात. तिरुमला तिरुपती देवस्थानाच्या व्यवस्थेचा भाग असलेल्या मंडळाचे सदस्य आणि कर्मचारीही तिथल्या चुका शोधू शकत नाहीत. चुका शोधून काढल्या तरी त्याबद्दल ते बोलत नाहीत. हिंदू धर्माचं पालन करणारे सर्व लोक यामुळं दुखावले आहेत. लाडू प्रसाद बनवताना प्राण्यांचे घटक असलेले तूप वापरण्यात आले होते. धर्म पूर्ववत करण्याच्या दिशेनं पावले उचलण्याची वेळ आली आहे", असं पवन कल्याण यांनी म्हटलं.
हेही वाचा -
- तिरुपती लाडूकरिता तूप पुरविणाऱ्या डेअरीची तपासणी, भेसळ झाली नसल्याचा कंपनीकडून दावा - Tirupati Laddu Controversy
- तिरुपती लाडूच्या तुपात जनावरांची चरबी असल्याची सरकारी लॅबकडून पुष्टी, नेमकी भेसळ कशी झाली? - tirupati laddu news
- तिरुपतीच्या लाडूत तुपाऐवजी चरबीचा वापर, चंद्राबाबू नायडू यांचे वायएसआर काँग्रेसवर आरोप - Chandrabau Naidau News