मुंबई Abhishek Bachchan : अभिषेक बच्चन त्याच्या नवीन चित्रपट 'बी-हॅपी'मुळे चर्चेत आहे. यात तो सिंगल फादरची भूमिका साकारणार आहे. आज 21 सप्टेंबर रोजी या चित्रपटामधील एक नवीन पोस्टर रिलीज करण्यात आलं. यात अभिषेक बच्चन त्याच्या मुलीबरोबर पडद्यावर दिसत आहे. आंतरराष्ट्रीय कन्या दिनानिमित्त 'बी-हॅपी'चं नवीन पोस्टर शेअर केलं असून हा चित्रपट लवकरच प्राइम व्हिडिवर प्रसारित होईल.
'बी हॅप्पी' चित्रपटामधील पहिलं पोस्टर : अभिषेक बच्चन व्यतिरिक्त या चित्रपटामध्ये इनायत वर्माही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'बी हॅप्पी' या चित्रपटात अभिषेक बच्चन हा आपल्या मुलीच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेताना दिसणार आहे. चित्रपटाच्या पोस्टरबद्दल बोलायचं झालं तर अभिषेक आणि इनायत यात डान्स करताना दिसत आहेत. चित्रपटाच्या कथेत अभिषेकच्या मुलीला देशातील सर्वात मोठ्या डान्स रिॲलिटी शोमध्ये परफॉर्म करायचं आहे. या चित्रपटात अभिषेकचं नाव शिव रस्तोगी असणार आहे. 'बी हॅपी' या चित्रपटाचं दिग्दर्शन कोरिओग्राफर आणि चित्रपट दिग्दर्शक रेमो डिसूझा यांनी केलंय.
'बी हॅप्पी' चित्रपटातील स्टारकास्ट : या चित्रपटाबाबत रेमोनं म्हटलं, "बी हॅप्पी' ही एक मनाला भिडणारी वडील-मुलीची कथा आहे, यामध्ये एक वडील आपल्या मुलीच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी तिच्या आईची देखील भूमिका साकारताना दिसेल." आंतरराष्ट्रीय कन्या दिनानिमित्त पोस्टर शेअर करत त्यानं पुढं म्हटलं, "चाहत्यांनो, मला तुमच्याबरोबर चित्रपटाचं फर्स्ट लूक शेअर करताना आनंद झाला आहे." दरम्यान रेमोची पत्नी लीज डिसूझानं या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात नोरा फतेही, जॉनी लीव्हर, हरलीन सेठी, राघव जुयाल, अमिताभ बच्चन, सूरज पांचोली, शिवानी रघुवंशी, जयदीप अहलावत आणि इतर कलाकार दिसणार आहेत. प्राइम व्हिडिओवर 240 हून अधिक देशांमध्ये 'बी-हॅपी' प्रसारित होत असल्यानं अनेकांना हा चित्रपट सहज पाहणं शक्य होईल.
हेही वाचा :
- 'आयुष्य कधीच सोपं नसतं' म्हणत अमिताभ बच्चननं लिहिली गूढ पोस्ट - Amitabh Bachchan share cryptic post
- अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्यात दुरावा? ज्यु. बच्चननं घटस्फोटाच्या पोस्टला केलं लाईक - abhishek bachchan and aishwarya rai
- बिग बींचा 'कल्की 2898 एडी'चा ट्रेलर पाहून अभिषेक बच्चननं म्हटलं 'माइंडब्लोइंग' - KALKI 2898 AD TRAILER