मुंबई - Lahore 1947 : प्रीती झिंटा ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीपैकी एक आहे. तिनं 'दिल से' या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केल्यानंतर 'कल हो ना हो', 'कभी अलविदा ना कहना' आणि 'वीर जरा' यांसारखे अनेक हिट चित्रपटांमध्ये काम करून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. आता ती बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान निर्मित 'लाहोर 1947' या चित्रपटातून दीर्घ काळानंतर मोठ्या पडद्यावर परतण्यासाठी सज्ज झाली आहे. नुकतेच या प्रीतीनं एक व्हिडिओ तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिनं 'लाहोर 1947'ची स्क्रिप्ट आणि चित्रपटाच्या टीमची झलक दाखवली आहे.
प्रीती झिंटानं शेअर केली पोस्ट :प्रीतीनंहा सर्वात कठीण चित्रपट असल्याचेही या पोस्टद्वारे सांगितलं आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, "लाहोर 1947'चं शूटिंग पूर्ण झालं आहे. या अद्भुत अनुभवासाठी मी संपूर्ण कलाकार आणि क्रूचे आभार मानते. मी मनापासून आशा करते की, तुम्ही सर्वजण या चित्रपटाचे कौतुक कराल. आम्हाला हा चित्रपट बनवताना जितका आनंद मिळाला तितकाच तुम्ही देखील घ्याल. माझा हा आतापर्यंतच्या कारकिर्दीमधील सर्वात कठीण चित्रपटांपैकी एक आहे. आमिर, सनी, शबाना जी, संतोष सिवान आणि ए .आर. रहमान यांचे मनःपूर्वक आभार." आता या पोस्टवर काही चाहते कमेंट्स करून या चित्रपटाविषयी उत्सुक असल्याचं सांगत आहे.