मुंबई - Deepika Padukone : हिंदी चित्रपटसृष्टीतील सुंदर अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे. दरम्यान रणवीर सिंग अनेकदा आपल्याची पत्नीची काळजी घेताना दिसतो. दीपिका गरोदरपणात तिच्या आईबरोबर असते. गेल्या शनिवारी दीपिका मुंबईत फॅमिली डिनर डेटवर गेले होती, तेव्हा तिनं आपल्या आईबरोबर काही सुंदर क्षण घालवले. दीपिका पदुकोण नुकतीच फॅमिली डिनर एन्जॉय करताना स्पॉट झाल्यानंतर तिला आता तिचे चाहते बाहेर न खाण्याचा सल्ला देत आहेत. दीपिकाचा एक व्हिडिओ प्रचंड वेगानं व्हायरल झाला आहे, ज्यावर अनेकजण कमेंट्स करत आहेत.
दीपिका पदुकोण गेली फॅमिली डिनर डेटला :दीपिकाशनिवारी संध्याकाळी वांद्रे येथील एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसली. तिच्या चेहऱ्यावर गरोदरपणाची चमक स्पष्ट दिसत होती. फ्लोरल टॉप आणि जीन्समनध्ये दीपिका ही खूप सुंदर दिसत होती. यावेळी तिनं केस बनमध्ये बांधले होते. दीपिकाचा हा स्टायलिश लूक अनेकांना आवडत आहे. व्हिडिओमध्ये दीपिकाचा बेबी बंप स्पष्ट दिसत होता. दरम्यान यावर्षी 29 फेब्रुवारीला दीपिका आणि रणवीर सिंगनं प्रेग्नंसीची घोषणा केली होती. या जोडप्यानं सांगितलं होतं की, त्यांना पहिलं बाळ होणार आहे. दीपिकाला सप्टेंबरमध्ये बाळ होत असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान या जोडप्यानं सहा वर्षे डेटिंग केल्यानंतर 14 नोव्हेंबर 2018 रोजी इटलीतील लेक कोमो येथे लग्न केलं होतं.