ETV Bharat / politics

पालकमंत्री पदावरून कोल्हापुरात 'रस्सीखेच', शिवसेनेचं पारडं जड - KOLHAPUR GUARDIAN MINISTER

महायुतीनं कोल्हापूर जिल्ह्यात अपक्षासह दहाही जागा जिंकल्या आहेत. आता जिल्ह्याला मंत्रिपदाचं वेध लागलं आहे. जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार याकडे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.

KOLHAPUR GUARDIAN MINISTER
कोल्हापूरात पालकमंत्री पदासाठी चुरस (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 26, 2024, 10:58 PM IST

कोल्हापूर : राज्यात महायुतीनं बंपर यश मिळवल्यानंतर आता राज्यातील जनतेच्या नजरा शपथविधीकडे लागल्या आहेत. महायुती सरकारमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील कोणाला मंत्रीपद मिळणार? याबरोबरच जिल्ह्याचे पालकमंत्री पद कोण सांभाळणार? याकडेही जिल्हावासियांच्या नजरा लागल्या आहेत. कोल्हापूरला शिवसेनेच्या माध्यमातून अजून एकदाही पालकमंत्री पद मिळालं नाही. मात्र, यंदा तीन जागा जिंकल्यामुळं शिवसेनेकडं पालकमंत्री पद जाणार, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार याकडे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.

ज्याचे जास्त आमदार त्या पक्षाला पालकमंत्री पद : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात दमदार यश मिळवलेल्या महायुतीनं इतिहासात पहिल्यांदाच 10 विधानसभा सदस्य निवडून आणत निर्विवाद वर्चस्व मिळवलं. यापूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पालकमंत्री पद भूषवलं आहे. मात्र आता जिल्ह्यातील 3 जागा धनुष्यबाणावर निवडून आणत ज्या पक्षाचे जास्त आमदार त्या पक्षाला पालकमंत्री पद हा यापूर्वीचा फॉर्मुला असल्यामुळं शिवसेनेचे जिल्ह्यातील आमदार राजेश क्षीरसागर, प्रकाश अबिटकर, चंद्रदीप नरके यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता आहे. तर भाजपाकडून अमल महाडिक आणि राष्ट्रवादीकडून आमदार हसन मुश्रीफ मंत्री पदाच्या रेसमध्ये असणार.

प्रसार माध्यमांशी बोलताना राजेश क्षीरसागर (Source - ETV Bharat Reporter)

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं होतं वर्चस्व : सहकार क्षेत्राचं संस्थात्मक राजकारण असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात गेली दोन दशक काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं वर्चस्व निर्माण केलं होतं. मात्र, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुतीनं विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या घवघवीत यशानंतर आता सहकाराची पंढरी म्हणून ओळख असलेल्या कोल्हापूर जिल्ह्याची समीकरणं बदलणार आहेत. 1995 साली राज्यात शिवसेना भाजपाचं सरकार आल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याला रामदास कदम यांच्या रूपानं शिवसेनेला पालकमंत्री पद मिळालं होतं. यानंतर मात्र, जिल्ह्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं पुन्हा निर्विवाद वर्चस्व निर्माण केलं. 1999 वर्षी राज्यात आलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारमध्ये काँग्रेसकडून प्रकाश आवाडे यांना मंत्रीपद मिळालं, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दिग्विजय खानविलकर, हसन मुश्रीफ यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली होती.

शिवसेना पालकमंत्री पदावर करणा दावा : राज्यात आघाडीचं सरकार असताना जिल्ह्याचे पालकमंत्री पद पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील यांच्याकडे राहिलं. तर 2009 मध्ये तिसऱ्यांदा राज्यात सरकार आल्यानंतर आघाडीचं पालकमंत्री पद सतेज पाटील यांच्याकडे देण्यात आलं. 2014 मध्ये राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राज्याचं मुख्यमंत्री पद भाजपाकडे गेलं, तर जिल्ह्याला चंद्रकांत पाटील यांच्या रूपानं पहिल्यांदाच भाजपाचा पालकमंत्री मिळाला. 2019 च्या महाविकास आघाडी सरकारमध्ये सतेज पाटील दुसऱ्यांदा पालकमंत्री झाले, तर राज्यातील दोन पक्षात झालेल्या फुटीनंतर अस्तित्वात आलेल्या महायुती सरकारमध्ये पहिल्यांदा दीपक केसरकर आणि त्यानंतर हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सांभाळलं. यंदाच्या विधानसभेत शिवसेनेच्या तीन जागा निवडून आल्यानंतर शिवसेना जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर दावा करणार आहे.

जिल्ह्यातून 'यांना' लागेल मंत्रीपदाची 'लॉटरी' : जिल्ह्यात महायुतीनं दहा पैकी दहा जागांवर दणदणीत विजय मिळवला. नवनिर्वाचित आमदारांमध्ये इचलकरंजीचे राहुल आवाडे, चंदगडचे शिवाजी पाटील, हातकणंगलेमधून अशोकराव माने वगळता सर्वच आमदारांकडे दोन किंवा तीनदा निवडून येण्याचा अनुभव आहे. सर्वाधिक शिवसेनेकडे तीन आमदारांचं संख्याबळ असल्यामुळं राजेश क्षीरसागर, प्रकाश अबिटकर, चंद्रदीप नरके यांना मंत्रीपदाची संधी आहे. तर भाजपकडून अमल महाडिक, राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ तर महायुतीचे सहयोगी पक्ष असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाकडून विनय कोरे, शाहू आघाडीकडून राजेंद्र पाटील-यड्रावकर हे नेते मंत्रीपदाच्या रेसमध्ये आहेत. यापूर्वी मंत्री म्हणून काम केलेल्यांच्या यादीत हसन मुश्रीफ, विनय कोरे, राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचा समावेश आहे. तर राज्य नियोजन मंडळाच्या माध्यमातून कॅबिनेट मंत्री दर्जा असलेलं पद राजेश क्षीरसागर यांनी भूषवलं आहे. त्यामुळं शिवसेनेकडून राजेश क्षीरसागर पालकमंत्री पदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत.

शिवसेनेला मिळणार पालकमंत्री पद?: जिल्ह्यात यापूर्वी शिवसेनेला कधीच पालकमंत्री पद मिळालेलं नाही, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील मतदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत तीन विधानसभेच्या जागा जिंकल्या आहेत, त्यामुळं नैसर्गिकरित्या शिवसेनेचाच पालकमंत्री पदावर दावा असणार आहे.

हेही वाचा

  1. सातारा, वाईला मिळणार लाल दिवा, पालकमंत्रिपदासाठी शिवेंद्रराजेंचं नाव चर्चेत
  2. 26/11 च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला 16 वर्ष, आजची स्थिती काय?
  3. 'ईव्हीएम'मध्ये 15 टक्के मतं महायुतीच्या उमेदवारांसाठी सेट ; शरद पवारांनी घेतला 'हा' मोठा निर्णय

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.