मुंबई : गृह मंत्रालयानं 25 जानेवारी 2025 रोजी पद्म पुरस्कार विजेत्यांची यादी जाहीर केली होती. हा सन्मान त्या व्यक्तीचा करण्यात येणार आहे, ज्यांनी आपल्या क्षेत्रात उत्कृष्ट काम केलं आहे. या यादीत चित्रपट निर्माते, अभिनेते, संगीतकार, सामाजिक कार्यकर्ते यांचा समावेश आहे. दरवर्षीप्रमाणे, या वर्षीही पद्म पुरस्कार तीन श्रेणींमध्ये देण्यात आला आहे, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री. त्यापैकी सात जणांना पद्मविभूषण प्रदान करण्यात आला आहे, जो भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार मानला जातो. तर 19 व्यक्तींना पद्मभूषण आणि 113 व्यक्तींना पद्मश्रीनं सन्मानित करण्यात येईल. हा सन्मान कला, विज्ञान, सामाजिक कार्य, सार्वजनिक व्यवहार, क्रीडा इत्यादी क्षेत्रात दिला जात असतो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मार्च-एप्रिल 2025 मध्ये राष्ट्रपती भवनात विजेत्यांना हे पुरस्कार प्रदान करतील.
पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित व्यक्तींची नावे
- प्रसिद्ध लोकगायिका शारदा सिन्हा यांना पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. त्यांचे 2024 मध्ये निधन झालं. छठ पूजा गाण्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या शारदा सिन्हा यांना भारतीय संगीतातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. तसेच हा सन्मान मरणोत्तर असणार आहे.
- मल्याळम साहित्यातील महान लेखकांपैकी एक एम.टी. वासुदेवन नायर यांना गेल्या डिसेंबरमध्ये त्याच्या निधनाच्या एका महिन्यानंतर पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.
'या' सेलिब्रिटींना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला
दुव्वुर नागेश्वर रेड्डी - वैद्यकशास्त्र
न्यायमूर्ती (निवृत्त) जगदीश सिंह खेहर - सार्वजनिक व्यवहार
कुमुदिनी रजनीकांत लाखिया - कला
लक्ष्मीनारायणन सुब्रमण्यम - कला
एम.टी. वासुदेवन नायर (मरणोत्तर) - साहित्य आणि शिक्षण
ओसामु सुझुकी (मरणोत्तर) – व्यापार आणि उद्योग (जपान)
शारदा सिन्हा (मरणोत्तर) - कला
'या' सेलिब्रिटींना पद्मभूषण पुरस्कार मिळाला