महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'पाताल लोक 2'ची रिलीज डेट जाहीर, जाणून घ्या, कधी आणि कुठं दिसणार ही मालिका - PAATAL LOK 2 RELEASE DATE

'पाताल लोक 2' च्या रिलीज डेटची प्रतीक्षा संपली आहे. हा लोकप्रिय क्राईम ड्रामा कुठं आणि दिसणार हे जाणून घेण्यासाठी वाचा.

'Paatal Lok 2' release date
'पाताल लोक 2'ची रिलीज डेट जाहीर ((Poster))

By ETV Bharat Entertainment Team

Published : 9 hours ago

मुंबई- 'पाताल लोक' या मालिकेला 2020 मध्ये प्रेक्षकांचा प्रचंड प्रेम मिळालं होतं. यातलं पात्र, उत्कंठा वाढवणारं कथानक आणि टीकेचाही झालेला भडिमार यामुळं ही मालिका खूप चर्चेत राहिली होती. त्यानंतर या मालिकेचा दुसरा भाग येणार याची प्रतीक्षा सुरू होती. आता याला विराम मिळाला असून या मालिकेचा दुसरा भाग येणार असल्याचं निर्मात्यांनी जाहीर केलं आहे. 'पाताल लोक 2' या मालिकेत जयदीप अहलावत, इश्वाक सिंग आणि गुल पनाग देखील दिसणार आहेत. त्याबरोबरच दुसऱ्या भागात तिलोत्तमा शोम, नागेश कुकुनूर आणि जाह्नू बरुआ हे नवीन चेहरेही दिसणार आहेत.

'पाताळ लोक 2' हा क्राईम ड्रामा कधी आणि कुठं बघायचा?

'पाताल लोक' मालिकेच्या पहिल्या भागाच्या क्लायमॅक्सनं लोकांच्या हृदयाचं ठोकं वाढवलं ​​होतं. प्राइम व्हिडिओनं 'पाताल लोक 2' या मालिकेची निर्मिती केली असून ही मालिका 17 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. 'पाताल लोक 2'चा ट्रेलर रिलीज होण्यापूर्वीच त्याची स्ट्रीमिंग डेट समोर आली आहे आणि आता प्रेक्षक त्याच्या ट्रेलरची मागणी करत आहेत. ही आठ भागांची मालिका सुदीप शर्मा, क्लीन स्लेट फिल्म्स आणि योनिया फिल्म्स एलएलपी यांनी तयार केली आहे. दरम्यान, 'पाताल लोक 2' च्या रिलीजच्या तारखेसह, निर्मात्यांनी त्याचे पोस्टर देखील रिलीज केलं आहे, यामध्ये जयदीप अहलावत दिसत आहेत.

चार वर्षांनी येत आहे पाताल लोकच्या दुसरा सीझन

'पाताल लोक'चा दुसरा सीझन चार वर्षांनंतर येत आहे. पहिल्या सीझनमध्ये 9 भाग होते. या गाजलेल्या क्राईम मालिकेचं दिग्दर्शन अविनाश अरुण आणि प्रोसित रॉय यांनी केलं होते. ही मालिका एका भारतीय पत्रकाराच्या 'द स्टोरी ऑफ माय असॅसिनेशन्स' या पुस्तकावर आधारित आहे. 'पाताल लोक'ला सुरुवातीच्या फिल्मफेअर ओटीटी पुरस्कारांमध्ये आठ नामांकने मिळाली होती आणि त्यातील पाच पुरस्कार जिंकले होते. सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार जयदीप अहलावतला मिळाला होता तर, सर्वोत्कृष्ट मालिका, सर्वोत्कृष्ट मूळ कथा, सर्वोत्कृष्ट पटकथा आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन या पुरस्कारांवर मालिकेनं मोहोर उमटवली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details