मुंबई - The Great Indian Kapil Show : कॉमेडियन कपिल शर्मा 'द ग्रेट इंडियन कपिल शो' हा नवीन शो प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहे. या शोबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहेत. यावेळी कपिलच्या शोमध्ये सुनील ग्रोव्हर आपल्या जुन्या अंदाजात दिसणार आहे. 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये तेच जुने चेहरे पाहिला मिळणार आहेत. पण या सीझनमध्ये एक कॉमेडियन दिसणार नाही. भारती सिंगनं या शोला टाटाला बाय-बाय केलं असल्याची माहिती मिळाली आहे. आतापर्यंतच्या सीझनमध्ये कृष्णा अभिषेक, भारती सिंग, चंदू आणि इतर कलाकारांनी भरपूर मनोरंजन केलं आहे. आता हा हंगाम धमाकेदार असणार असल्याचं बोललं जात आहे.
भारती सिंगनं केला खुलासा : 'द ग्रेट इंडियन कपिल शो' हा सीझन टेलिव्हिजनवर प्रसारित होणार नसून ओटीटीवर दिसणार आहे. नुकताच 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा ट्रेलर रिलीज झाला, ज्यामध्ये 'बुवा' भारती सिंग दिसली नाही. ट्रेलरमध्ये ती न दिसल्यामुळे तिच्याबाबतीत अफवा सोशल मीडियावर पसरू लागल्या. आता खुद्द भारतीनं या संदर्भात खुलासा केला आहे. एका दिलेल्या मुलाखतीत भारतीनं सांगितलं की, ''कपिलच्या शोमध्ये सहभागी होण्याचा तिचा कोणताही विचार नाही. मला फोन आला तर मी नक्की जाईन. मी सध्या माझे प्रोजेक्टस्, पॉडकास्ट आणि 'डान्स दिवाने'च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे.'' भारती सिंगनं कपिल शर्मा शोच्या सर्व सीझनमध्ये 'बुवा'ची भूमिका साकारली होती. तिचे हे पात्र खूप प्रसिद्ध झालं आहे. तिच्या या पात्राला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलंय.