महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'स्क्विड गेम 2'नंतर तिसऱ्या सीझनबद्दल आली अपडेट, जाणून घ्या कधी होईल रिलीज - SQUID GAME 3

अलीकडेच नेटफ्लिक्सवर 'स्क्विड गेम 2' रिलीज झाला आहे. आता तिसऱ्या सीझनबद्दल एक अपडेट आली आहे.

squid game 3
स्क्विड गेम 3 (Squid Game 2 Set To Premiere Tomorrow; Brace For Seong Gi-hun's Ultimate Quest For Justice In Season 3 (Photo: Film Poster))

By ETV Bharat Entertainment Team

Published : Dec 31, 2024, 12:23 PM IST

मुंबई : कोरियन वेब सीरीज 'स्क्विड गेम 2' सध्या ओटीटी प्लेटफॉर्म नेटफ्लिक्सवर जगभरात धुमाकूळ घालत आहे. या सीरीजचा दुसरा सीझन नुकताच रिलीज झाला असून हा सीझन देखील खूप पसंत केला जात आहे. दुसऱ्या सीझनच्या पुनरागमनानं तिसऱ्या सीझनचीही प्रतीक्षा आता सुरू झाली आहे. 'स्क्विड गेम' जगभरात सध्या ट्रेंडिंगवर आहे. अनेक चाहते सोशल मीडियाच्या माध्यामातून या सीझनबद्दल चर्चा करत आहेत. निर्मात्यांनी दुसरा सीझन रिलीज होण्यापूर्वीच सांगितलं होतं की, ही सीरीज तीन सीझनमध्ये संपणार आहे. आता दुसरा सीझन प्रदर्शित झाल्यानंतर तिसऱ्या सीझनमध्ये काय होणार, याबद्दल अनेकजण आतुर आहे.

'स्क्विड गेम 2' सीरीज कधी होईल रिलीज :रिपोर्ट्सनुसार, 'स्क्विड गेम 3' 2025 मध्ये नेटफ्लिक्सवर रिलीज होईल. याहू एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार, 'स्क्विड गेम'चा तिसरा सीझन जून 2025 मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होऊ शकतो. मात्र 'स्क्विड गेम'च्या निर्मात्यांनी अद्यापही याबद्दल पुष्टी केलेली नाही. मात्र लवकरच 'स्क्विड गेम 3'ची रिलीज तारीख जाहीर होऊ शकते. 'स्क्विड गेम 3'बद्दल संचालक ह्वांग डोंग-ह्युक यांनी त्याच्या एका निवेदनात म्हटलं, 'सीझन 2ची तारीख जाहीर करण्यासाठी आणि सीझन 3ची बातमी शेअर करण्यासाठी हे पत्र लिहिताना मला आनंद होत आहे. जेव्हा आम्ही सीझन 2च्या पहिल्या दिवसाचे शूटिंग सुरू केलं होतं, तेव्हा मी विचार केला होता की, 'स्क्विड गेम ' जगात परतला आहे. यानंतर मला वाटलं की, तीन वर्षांनंतर 'स्क्विड गेम' परत आल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं असेल.'

'स्क्विड गेम 2'ची स्टार कास्ट : 'स्क्विड गेम 2'मध्ये ली जंग-जे, ली ब्युंग-हुन, इम सी-वान, कांग हा-नेउल, वाई हा-जून, ली जिन-वूक, पार्क सुंग-हू, यांग डोंग-गेन, ली सेओ-ह्वान, जो यू-री, कांग ए-शिम आणि पार्क ग्यू-यंग यांनी खूप सुंदर अभिनय केला आहे. 'स्क्विड गेम 2' सीझनमधील काही असे कलाकार आहेत, जे पहिल्या सीझनचे भाग नव्हते. आता तिसऱ्या सीझनमध्ये आणखी काही नवीन कलाकार प्रेक्षकांना पाहायला मिळेल. 'स्क्विड गेम 2'मध्ये मुख्य पात्र ली जंग-जे हा पुन्हा स्क्विड गेम खेळण्यासाठी जातो. त्यांचा हेतू हा सर्व खेळाडूंना वाचविण्याचा असतो. यानंतर तो गेम खेळतो, मात्र गेमदरम्यान तो 'स्क्विड गेम'ची मजा पाहणाऱ्या व्यक्तींना मारण्याची प्लॉनिंग करतो. यानंतर तो त्यांना मारण्याचा प्रयत्न करतो, मात्र त्याला पकडण्यात येते आणि यावर दुसरा सीझन समाप्त होतो.

हेही वाचा :

  1. भारतात 'स्क्विड गेम 2' कधी आणि कुठे पाहायची, जाणून घ्या वेब सीरीज संबंधित 'या' गोष्टी...
  2. नेटफ्लिक्सवर सुरू होणार जीवघेणा मृत्यूचा खेळ, 'स्क्विड गेम सीझन 2' चा धडकी भरवणारा ट्रेलर प्रदर्शित
  3. प्रेक्षकांना हादरवून सोडणाऱ्या 'स्क्विड गेम' वेब सिरीजच्या दुसऱ्या सीझनचा टिझर लॉन्च

ABOUT THE AUTHOR

...view details