मुंबई - बॉक्स ऑफिसवर साऊथ फिल्म इंडस्ट्री आणि बॉलिवूडच्या चित्रपटामध्ये स्पर्धा पाहायला मिळत आहे. यात साऊथच्या सिनेमांनी नेहमीच बाजी मारली आहे. सध्या साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन स्टारर चित्रपट पुष्पा 2 द रुलने बॉक्स ऑफिसवर दबदबा निर्माण केला आहे. दरम्यान, साऊथ फिल्म इंडस्ट्रीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मॉलीवूड (मल्याळम) या दक्षिण चित्रपटसृष्टीला चालू वर्षात 700 कोटी रुपयांचे नुकसान झालं आहे.
केरळ फिल्म प्रोड्युसर असोसिएशनने एका निवेदनात म्हटलं आहे की 2024 मध्ये मॉलीवूडमधून 199 चित्रपट प्रदर्शित झाले आहेत आणि या चित्रपटांची किंमत 1000 कोटी रुपये आहे. यावर्षी रिलीज झालेल्या 199 चित्रपटांपैकी केवळ 26 मॉलीवूड चित्रपट हिट झाले आहेत, ज्यामुळे मॉलीवुडला 700 कोटी रुपयांचे मोठे नुकसान झालं आहे. चित्रपटांचं वाढतं बजेट आणि अभिनेत्यांची भरमसाठ फी हे यामागे कारण असल्याचं असोसिएशननं म्हटलं आहे. असोसिएशननं 2024 हे वर्ष मॉलीवूडसाठी सर्वात तोट्याचं वर्ष ठरल्याचं म्हटलं आहे. 1000 रुपये किमतीच्या चित्रपटांकडून केवळ 300 कोटी रुपयांचा परतावा मिळवला आहे.