मुंबई - कन्नड फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार आणि सर्वाधिक मानधन घेणारा दिवंगत अभिनेता पुनीत राजकुमार याची आज २९ ऑक्टोबर रोजी पुण्यतिथी आहे. एक उत्कृष्ट अभिनेता असण्याबरोबरच पुनीत एक उत्तम गायक, निर्माता, टीव्ही प्रेझेन्टर आणि सामाजिक कार्यकर्ता देखील होता. पुनीत हा पद्मभूषण आणि दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित अभिनेता डॉ. राजकुमार यांचा मुलगा होता. त्याला करण्यात आलं. रील लाइफ हिरो असण्याबरोबरच पुनीत हा खऱ्या आयुष्यातही लोकांचा हिरो होता.
पुनीत राजकुमारचे चाहते त्याला पॉवर स्टार म्हणायचे. कन्नड फिल्म इंडस्ट्रीमध्ये पुनीत हा सर्वाधिक मानधन घेणारा कलाकार होता. पुनीत एका चित्रपटासाठी 15-20 कोटी रुपये घेत असे. ही फी जवळपास कांताराच्या ऋषभ शेट्टी इतकीच आहे. पुनीतची एकूण संपत्ती 187 कोटी रुपये होती.
मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी चांगले काम- पुनीत हा फक्त रील हिरो नव्हता तर तो खऱ्या आयुष्यातही हिरो होता. म्हैसूरमध्ये त्यांच्या आईसह सेवाभावी कार्यात तो नेहमीच अग्रेसर असत. त्यानं सुमारे 2000 मुले दत्तक घेतली होती, ज्यांच्या शिक्षणाचा खर्च त्यांनी स्वतः उचलला होता. याशिवाय त्यांनी 46 अनाथाश्रम, 16 वृद्धाश्रम आणि 19 गोआश्रम सुरू केले होते जे त्यांचे कुटुंब आजही चालवत आहेत. कोरोना महामारीच्या काळातही पुनीतने ५० लाख रुपये मदत म्हणून दिले होते.
वयाच्या 10 व्या वर्षी मिळाला होता राष्ट्रीय पुरस्कार- एकीकडे बड्या कलाकारांना राष्ट्रीय पुरस्कार मिळण्यासाठी अनेक वर्षे लागतात, परंतु, पुनीतला वयाच्या अवघ्या १०व्या वर्षी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. बेट्टाडा हूवू या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट बालक पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. याशिवाय त्याला सर्वोत्कृष्ट फिल्मफेअर पुरस्कार, कर्नाटक राज्य चित्रपट पुरस्कारही मिळाला आहे. पुनीतचे 14 चित्रपट असे होते जे सलग 100 दिवस थिएटरमध्ये चालले होते.
हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू, दोन दिवस दारूबंदी- पुनीत राजकुमार यांचे 29 ऑक्टोबर 2021 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्याची फॅन फॉलोइंग इतकी प्रचंड होती की त्याच्या शेवटच्या दर्शनासाठी 30 लाख चाहते बेंगळुरूमध्ये जमले होते. गर्दी इतकी प्रचंड होती की बेंगळुरू शहरात कलम 144 लागू करावे लागले आणि दंगल रोखण्यासाठी दोन दिवस दारूविक्रीही बंद करण्यात आली होती.