ETV Bharat / entertainment

'कांगुवा' ऑस्कर 2025 मध्ये दाखल, 'हे' 5 भारतीय चित्रपटही यादीत सामील... - KANGUVA MOVIE

'कांगुवा' 2025च्या ऑस्करमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी झाला आहे. हा चित्रपट 2024मध्ये मेगाफ्लॉप ठरला होता.

Kanguva movie
कांगुवा चित्रपट ('कांगुवा'ची ऑस्कर 2025मध्ये एंट्री (Poster))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Jan 7, 2025, 2:27 PM IST

मुंबई : साऊथ अभिनेता सुर्या आणि बॉलिवूड स्टार बॉबी देओलचा चित्रपट 'कांगुवा' बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकलेला नाही. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी लागलेले पैसे देखील वसूल होऊ शकले नाही. 'कांगुवा' चित्रपट 2024 सर्वात मोठा बिग बजेट फ्लॉप होता. सूर्या आणि बॉबीची जोडी प्रेक्षकांना आकर्षित करण्यात अपयशी ठरली. आता 'कांगुवा' संदर्भात एक दमदार बातमी समोर येत आहे. 'कांगुवा' चित्रपट ऑस्कर 2025च्या यादीत आहे. ऑस्कर 2025च्या लिस्टमध्ये 323 जागतिक चित्रपटांशी स्पर्धा करत 'कांगुवा'नं ऑस्कर स्पर्धकांच्या यादीत स्थान मिळवलं आहे. तसेच या यादीत आणखी 5 भारतीय चित्रपटांची नावे आहेत. यात 'द गॉट लाइफ', 'स्वतंत्र वीर सावरकर' ,'ऑल वी इमेजन एस लाइट', 'गर्ल्स विल बी गर्ल्स' आणि 'अनुजा' यांचा समावेश आहेत. दरम्यान 'कांगुवा'चं नाव यादी आल्यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. आता सूर्याचे चाहते चांगलेच खूश होत आहेत.

'कांगुवा' ऑस्कर 2025ला जाणार : सिरुथाई शिवा दिग्दर्शित 'कांगुवा' हा चित्रपट 14 नोव्हेंबर 2024 रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. अंदाजे 350 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटात अनेक मोठे ॲक्शन सीन्स दाखवण्यात आले होते. या चित्रपटाचा प्रेक्षकांवर फारसा प्रभाव पडला नाही. फिल्म इंडस्ट्री ट्रॅकर मनोबाला विजयबालन यांनी त्यांच्या एक्स हँडलवर ऑस्कर 2025 ला जाणाऱ्या 'कांगुवा'बद्दल माहिती दिली आहे. विजयबालनच्या मते, 'कांगुवा' या चित्रपटानं ऑस्कर 2025 मध्ये स्थान मिळवले आहे. आता या व्हायरल झालेल्या पोस्टवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देऊन आपला आनंद व्यक्त करत आहेत.

'कांगुवा' मेगाफ्लॉप : याशिवाय काहीजणांना मेगाफ्लॉप चित्रपट 'कांगुवा' ऑस्करमध्ये जाण्यावर आश्चर्य व्यक्त केलं आहे. याशिवाय अनेक यूजर्सनं एक्स हँडलवर 'कांगुवा'चे निर्माते, दिग्दर्शक आणि त्याच्या स्टार कास्टचे अभिनंदन केले आहेत. विजयबालनच्या या पोस्टवर अनेक युजर्सनी फायर इमोजी पोस्ट करत आहेत. 'कांगुवा'नं बॉक्स ऑफिसवर 100 कोटींची कमाईही केलेली नाही. या चित्रपटाची एकूण कमाई 96 कोटींची झाली होती. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी दावा केला होता की, 'कांगुवा' चित्रपट 2000 कोटी रुपये कमवेल. दरम्यान 8 डिसेंबर 2024 रोजी हा चित्रपट अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित झाला होता.

हेही वाचा :

  1. सूर्या स्टारर 'कांगुवा'चं ॲडव्हान्स बुकिंग जोरदार सुरू, पहिल्या दिवशी 2 कोटींहून अधिक केलं कलेक्शन
  2. सूर्या - बॉबी देओल स्टारर 'कांगुवा'चं नवीन ट्रेलर रिलीज, पाहा स्टार्सचा थरारक अंदाज...
  3. मुंबईत सूर्या शिवकुमार स्टारर 'कांगुवा' चित्रपटाचं झालं प्रमोशन, फोटो आणि व्हिडिओ व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.