महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'लापता लेडीज' ऑस्करच्या शर्यतीत आल्यानंतर आनंदाच्या भरात नाचली नितांशी गोयल - Lapata Ladies Nitanshi Goyal - LAPATA LADIES NITANSHI GOYAL

LAPATA LADIES OSCAR RACE : 'लापता लेडीज' चित्रपटाची निवड भारताकडून ऑस्कर पुरस्काराच्या नामांकनासाठी झाल्यानंतर कलाकार आनंदित झाले आहेत. या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी नवोदित अभिनेत्री नितांशी गोयलसाठी ही बातमी खूप खास ठरली. ही बातमी कळताच ती आनंदाच्या भरात घरी नाचल्याचं तिनं म्हटलंय.

Nitanshi Goyal
नितांशी गोयल (Nitanshi Goyal/ ANI/ Instagram- NitanshiGoyalOfficial)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 24, 2024, 2:00 PM IST

मुंबई - किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज' हा चित्रपट ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपट श्रेणीसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाल्यानंतर खूप चर्चेत आहे. चित्रपटाशी संबंधित कलाकार, तंत्रज्ञ आणि निर्माते यांच्या आनंदाला सीमा राहिलेली नाही. यामध्ये 'फूल कुमारी' या गोड भूमिकेतून रुपेरी पडद्यावर पदार्पण करणारी अभिनेत्री नितांशी गोयलच्या आनंदाला तर पारावारच उरलेला नाही.

नितांशीनं 'लापता लेडीज' चित्रपटाच्या ऑस्कर प्रवेशाची बातमी पहिल्यांदा ऐकली तेव्हा या 17 वर्षांच्या मुलीला तिचा उत्साह आवरता आला नाही. तिच्या भावना शेअर करताना तिने एएनआयला सांगितलं की, "मला खूप आनंद झाला. मी खोलीत सगळीकडे नाचत होते. मी कृतज्ञतेनं भरून गेले होते. मी खरोखर खूप आनंदी आहे कारण हा चित्रपट माझ्यासाठी खूप खास आहे. विशेषत: मी साकारलेलं पात्र, 'फूल' याला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळालं आहे."

"किरण मॅडम, आमिर सर आणि माझ्या प्रेक्षकांची मी मनापासून आभारी आहे. या सर्वांनी आम्हाला आंतरराष्ट्रीय स्तरावर उडण्यासाठी पंख दिलं आहेत. आता या चित्रपटाचे भारतातच नाही तर परदेशातही कौतुक होईल, असं वाटतं. खरंच विश्वासच बसत नाही.", असं ती म्हणाली.

या निमित्तानं नितांशी गोयलनं 'लापता लेडीज'च्या सेटवरील एक संस्मरणीय क्षण देखील शेअर केला आहे. आमिर खान यांनी तिला स्वतः मेसेज केल्यानंतर तिचा आत्मविश्वास वाढला होता याचा खास उल्लेख तिनं केला आहे.

ती म्हणाली, "आमिर सर तांत्रिकदृष्ट्या सेटवर नव्हते, पण ते आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज पाठवत असत. एखादा शॉट ठीक आहे की नाही हे ते आम्हाला सांगायचे," असं ती म्हणाली.

"मला आठवतं की शूटिंगच्या दुसऱ्या दिवशी, एक सीन होता ज्याबद्दल मी थोडीशी साशंक होते. किरण मॅडम आणि आमिर सर यांना माझं काम पसंत पडत की नाही हे मला जाणून घ्यायचं होतं. मग किरण मॅडम माझ्याकडे आल्या आणि मला आमिर सरांचा मेसेज दाखवला. यामध्ये आमिर सरांनी 'तुझी फूल कमाल करत आहे', अशा आशयाचा मेसेज दिला होता. त्या दिवसापासून, मला खूप आत्मविश्वास वाटला, त्या संदेशाने मला खरोखर प्रोत्साहन मिळालं,"असं ती पुढे म्हणाली.

नितांशीने पुढे सांगितले की 'लापाता लेडीज' रिलीज झाल्यापासून तिला अजूनही परीकथेच्या जगात वावरत असल्याचं वाटतं. "मी एक परीकथेच्या जगात जगत आहे. रिलीज झाल्यापासून, माझ्या 'फूल' या व्यक्तिरेखेला मिळालेलं प्रेम जबरदस्त आहे. लोक मला त्यांच्या नजरेत खूप प्रेम देतात आणि हे फक्त प्रेक्षकच नाही तर लोकांचेही आहे. अनेक चित्रपट निर्माते आणि कलाकार यांचे मी मनापासून कौतुक करते, त्यांनी माझ्या कामाचे कौतुक केलं आहे, "अभिनेत्री म्हणाली.

1 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या 'लापता लेडीज'मध्ये नितांशी गोयल, प्रतिभा रंता, स्पर्श श्रीवास्तव, रवी किशन आणि छाया कदम यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

हेही वाचा -

  1. ऑस्करसाठी 29 चित्रपटांपैकी फक्त 'लापता लेडीज'ची का निवड झाली ? कारण आलं समोर - Laapataa Ladies
  2. रवी किशनने उलडले 'लापता लेडीज'मधील इन्स्पेक्टरच्या भूमिकेचे रहस्य - Laapataa Ladies Oscar entry
  3. ऑस्कर २०२५ च्या शर्यतीत 'लापता लेडीज'ने भारतीय सिनेसृष्टीतील २८ चित्रपटांना टाकले पिछाडीवर - Lapata Ladies nominated for Oscars

ABOUT THE AUTHOR

...view details