महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Nick Jonas to play Holi in India : निक जोनस पत्नी प्रियांका चोप्रा आणि मुलगी मालतीबरोबर भारतात साजरी करणार होळी - Nick Jonas to play Holi in India

Nick Jonas to play Holi in India : ग्लोबल स्टार देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनास मुंबई विमातळावर आज 18 मार्च रोजी स्पॉट झाला आहे. निक भारतात होळी सण साजरा करण्यासाठी आला असल्याचा अंदाज अनेकजण लावत आहे.

Nick Jonas to play Holi in India
निक जोनास भारतात होळी खेळणार आहे

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 18, 2024, 5:36 PM IST

मुंबई - Nick Jonas to play Holi in India : ग्लोबल स्टार देसी गर्ल प्रियांका चोप्रा नुकतीच ईशा अंबानीच्या होळी पार्टीला सहभागी होण्यासाठी मायदेशी आली होती. आता पुन्हा एकदा प्रियांका सासरी जाणार असल्याचा अंदाज अनेकांजण लावत होते, मात्र आता देसी गर्ल मोठ्या सुट्टीवर आली आहे. दरम्यान प्रियांकाचा पती निक जोनास देखील आता भारतात आला आहे. 'राष्ट्रीय जिजू' निक जोनास हा होळीचा आनंद लुटण्यासाठी सासरी आल्याचं समजत आहे. निकचा विमातळावरील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये तो विमातळाच्या बाहेर जाताना दिसत आहे.

निक जोनास व्हिडिओ व्हायरल :व्हिडिओत निकला पापाराझीनं घेरलेलं दिसत आहे. निकनं पापाराझीचं अभिवादन केलं. निकाचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकजण यावर कमेंट्स करत त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. एका चाहत्यानं कमेंट्स विभागात लिहिल, ''संपुर्ण कुटुंब आता भारतात आलं आहे मी खूप खुश आहे.'' दुसऱ्या एकानं लिहिलं, ''निक जूजू भारतात पुन्हा एकदा आले.'' आणखी एकानं लिहिल, ''निक हा भारतात होळी सण साजरा करण्यासाठी आला आहे.'' निकच्या या व्हिडिओवर अनेकजण हार्ट आणि फायर इमोजी शेअर करत आहेत. निकनं यावेळी पांढरे शर्टसह आणि मॅचिंग ट्राउझर्स आणि शूज घातले आहेत.

निक जोनास भारतात साजरी करणार होळी :याआधी प्रियांकाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा फोटो निकला खूप आवडला होता. त्यानं या फोटोवर कमेंट करून प्रियांकाचे कौतुक केले होते. भारतात होळीसाठी प्रियांका चोप्रा, निक जोनास आणि मालती मेरी चोप्रा जोनास आले असल्याचं समजत आहे. 25 मार्च रोजी होळी आहे. नुकताच निक जोनास एका म्यूझिकल कॉन्सर्टसाठी भारतात आला होता. निकनं पहिल्यांदाच भारतात (मुंबई) कॉन्सर्ट केला. या कॉन्सर्टमध्ये अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. प्रियांका चोप्रा आणि निक जोनास सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ते अनेकदा आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. याशिवाय निक अनेकदा आपल्या मुलीबरोबरचे फोटो शेअर करत असतो.

हेही वाचा :

  1. Elvish yadav : एल्विश यादवनं रेव्ह पार्ट्यांमध्ये सापाचे विष पुरवल्याची दिली कबुली, वाचा बातमी
  2. Shweta Bachchan : श्वेता बच्चनच्या वाढदिवसाच्या पार्टीत ऐश्वर्या आणि अभिषेक बेपत्ता
  3. Arbaaz Confirms Dabangg 4 : अरबाजचा 'दबंग 4' निर्मितीसाठी दुजोरा, मात्र अ‍ॅटलीशी भेटीचे केलं खंडन

ABOUT THE AUTHOR

...view details