मुंबई -Pulkit Samrat and kriti kharbanda : हिंदी चित्रपटसृष्टीचे सुंदर जोडपे अभिनेता पुलकित सम्राट आणि अभिनेत्री क्रिती खरबंदा यांनी नुकतेच गुरुग्राममधील ग्रँड आयटीसी भारत येथे सात फेरे घेतले आहेत. पुलकित आणि क्रितीला अनेकांनी त्यांच्या लग्नासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या जोडप्यानं 15 मार्च रोजी लग्न केलं असून त्यांनी 16 मार्च रोजी लग्नामधील काही फोटो चाहत्यांबरोबर शेअर केली आहेत. या जोडप्याच्या लग्नामधील फोटो सेलिब्रिटी आणि चाहत्यांना खूप आवडले आहेत. दरम्यान, पुलकित आणि क्रितीनं त्याच्या मेहंदी सेरेमनीचे सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.
पुलकित आणि क्रितीच्या मेहेंदी सेरेमनीचे फोटो :पुलकित आणि क्रितीच्या मेहेंदी सेरेमनीच्या फोटोमध्ये त्यानं हिरव्या रंगाचा कुर्ता पायजमा घातला आहे आणि तो आपल्या वधूच्या हातावर मेहंदी लावत आहे. दुसरीकडे क्रितीनं मेहंदी समारंभासाठी ऑफ व्हाईट रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे. यावर तिनं सुंदर असे दागिणे घातले आहेत. या लूकमध्ये ती खूप देखणी दिसत आहे. फोटोत पुलकित आणि क्रिती मेहंदी सोहळा खूप एन्जॉय करताना दिसत आहेत. या जोडप्यानं मेहेंदी सेरेमनीचे फोटो शेअर करत पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, ''प्रेमाचा रंग असा आहे की आपण दंग झालो आहोत.'' याशिवाय शेअर केलेल्या एका फोटोत पुलकित नाचताना दिसत आहे.