महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

नयनतारानं जुळे मुले आणि पती विग्नेश बरोबरचा फोटो शेअर करुन दिला घटस्फोटाच्या अफवांना पूर्ण विराम - Nayantharas Latest Post

Nayantharas Latest Post : साऊथ सुपरस्टार नयनतारा आणि तिचा दिग्दर्शक पती विग्नेश यांच्यात वाद सुरू असल्याच्या आणि त्यांनी एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केल्याच्या बातम्यांना ऊत आला होता. या अफवांना पूर्ण विराम लावत नयनताराने पती आणि आपल्या जुळ्यामुलांबरोबरचा फोटो शेअर केला आहे.

Nayanthara's Latest Pos
नयनतारा आणि विग्नेश

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 8, 2024, 10:02 AM IST

मुंबई- Nayantharas Latest Post : दक्षिण भारतीय चित्रपटांची लेडी सुपरस्टार नयनतारा आणि दिग्दर्शक विघ्नेश शिवन हे जोडपे प्रेक्षकांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. अलीकडेच, नयनताराने विघ्नेशला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याच्या बातम्या पसरल्या होत्या. यामुळे त्यांचे वैवाहिक जीवन अडचणीत सापडल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अखेर नयनताराने विघ्नेश आणि त्यांची जुळे मुले उलग आणि उईर यांच्या बरोबरचा एक आनंदी फोटो शेअर करुन अफवा पसरवणाऱ्यांची बोलती बंद केली आहे. तिने आपल्या इन्स्टाग्रामवर हा फोटो अपलोड केला आहे.

नयनताराची लेटेस्ट इन्स्टाग्राम पोस्ट

फोटोमध्ये नयनतारा हसमुख दिसत असून हातात एका मुलाला धरुन मोठ्याने हसताना दिसते. यामध्ये विग्नेही एका मुलाला बिलगून बसलेला दिसत आहे. दोघांनीही मॅचिंग काळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये नयनताराने लिहिलंय, "माझ्या मुलांसह खूप दिवसांनी प्रवास करतेय." हृदयाच्या इमोजीसह हा फोटो तिने शेअर केलाय.

काही दिवसापूर्वी नयनताराची इन्स्टा पोस्ट

काही दिवसापूर्वी नयनताराने इन्स्टाग्राम स्टोरीवर "मी हरवली आहे...", असे लिहिले होते. तिच्या या पोस्टनंतर तिला फॉलो करणाऱ्यांच्यात खळबळ उडाली होती. त्यानंतर नयनतारा आणि विघ्नेशच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. पण आताच्या पोस्टमध्ये विग्नेश आणि नयनतारा मुलांसह विमानातून प्रवास करताना पाहून चाहत्यांचा जीव भांड्यात पडला आहे.

यापूर्वीच्या एका पोस्टमध्ये नयनताराने म्हटले होते की, "ती कायमपणे म्हणत राहील, 'मला हे गवसले', अगदी डोळ्यात अश्रू असतानाही." या पोस्टनंतर विग्नेश आणि तिच्या चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. त्यानंतर तिने विग्नेशला अनफॉलो केल्याच्या बातम्यांमुळे हे संशयाचं वातावरण आणखी गडद होत गेलं. काहींना तिच्या या वाक्याचा असा अंदाज केला की, तिचा हा संदेश तिच्या नव्या चित्रपटाशी संबंधित असले. अशा अनेक शंका कुशंका चाहत्यांच्या मनात निर्माण झाल्या होत्या. त्यावरील मळभ दूर करण्याचे काम तिच्या या लेटेस्ट पोस्टमुळे झालं आहे.

अभिनेत्री नयनतारा आणि दिग्दर्शक विघ्नेश यांनी 9 जून 2022 रोजी शाही पद्धतीनं विवाह केला होता. चेन्नई शहराच्या बाहेर असलेल्या महाबलीपुरम येथे झालेल्या विवाह समारंभास सुपरस्टार रजनीकांत, शाहरुख खान, अजित कुमार, विजय सेतुपती असे दिग्गज कलाकार उपस्थित होते. लग्नानंतर चारच महिन्यानंतर त्यांनी सरोगसीच्या माध्यमातून उलग आणि उईर या जुळ्या मुलांना जन्म दिला. कामाच्या आघाडीवर नयनतारा शाहरुख खान स्टारर 'जवान' चित्रपटात दिसल्यानंतर अलिकडेच 'अन्नपूर्णी' या चित्रपटात दिसली होती. मात्र यातील काही वादग्रस्त संवादामुळे याचे ओटीटीवरील प्रसारण रोखण्यात आले होते.

हेही वाचा -

  1. नयनतारानं इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्यानंतर विघ्नेश शिवननं शेअर केली पहिली पोस्ट
  2. अन्नपूर्णी वादावर नयनताराने सोडले मौन, पहिल्यांदाच व्यक्त केली भावना
  3. 'त्या' वादग्रस्त सीनमुळे नयनतारा स्टारर 'अन्नपूर्णी'चे नेटफ्लिक्सनं थांबवले प्रसारण, तक्रार दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details