मुंबई - Navya Naveli Nanda : हिंदी चित्रपटसृष्टीचा दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन यांची नात नव्या नंदानं फार कमी वेळात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. नव्या चित्रपटसृष्टीपासून थोडी लांब राहाते. त्यामुळे तिनं आजपर्यंत कुठल्याचं चित्रपटांमध्ये काम केलं नाही. मात्र ती अनेकदा बॉलिवूडमधील इतर काही स्टार्स किडबरोबर पार्टी करताना दिसते. ती अनेकदा आपले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. याशिवाय ती एक यशस्वी बिझनेस वुमन आहे. नव्या सध्या आपल्या वडिलांबरोबर व्यवसाय सांभाळत आहे.
नव्या नवेली नंदानं केला आराध्याबद्दल खुलासा :नव्या सध्या तिच्या पॉडकास्ट शो 'व्हॉट द हेल नव्या'च्या दुसऱ्या सीझनमुळेही चर्चेत आहे. या शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये नव्याची आजी जया बच्चन आणि तिची आई श्वेता बच्चन आल्या होत्या. आता नुकतीच ती एका मुलाखतीत मामेबहीण आराध्या बच्चनबद्दल बोलताना दिसली. या मुलाखतीत नव्याला विचारण्यात आलं की, 'तिला तिच्या लहान बहिणीला काही सल्ला द्यायचा आहे का?' यावर तिनं उत्तर दिलं, 'आराध्या तिच्या वयात माझ्यापेक्षा जास्त हुशार आहे. आजची मुलं आपल्यापेक्षा खूप पुढे आहेत. तिच्या वयात मी तितकी हुशार नव्हते. मला वाटतं की आजची आपली संपूर्ण पिढी खूप कुशाग्र आहेत आणि त्यांना जग बदलायचं आहे.'