महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

संगीतकार प्यारेलाल शर्मा यांचा लक्ष्मीनारायण आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरव

composer Pyarelal Sharma : संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल या प्रतिष्ठित जोडीताल प्यारेलाल शर्मा यांना लक्ष्मीनारायण आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलंय. संगीतकार एल सुब्रमण्यम आणि कविता कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांनी प्यारेलाल यांना हा पुरस्कार प्रदान केला. अलिकडेच त्यांना पद्मभूषण पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती.

Music composer Pyarelal Sharma
संगीतकार प्यारेलाल शर्मा

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 8, 2024, 4:10 PM IST

नवी दिल्ली - composer Pyarelal Sharma : लक्ष्मीकांत-प्यारेलाल या प्रतिष्ठित संगीतकार जोडीतील प्रतिभावान संगीतकार प्यारेलाल शर्मा यांना लक्ष्मीनारायण आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलंय. लक्ष्मीनारायण ग्लोबल म्युझिक फेस्टिव्हलचा भाग म्हणून संगीतकार एल सुब्रमण्यम आणि कविता कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांनी प्यारेलाल यांना हा पुरस्कार प्रदान केला. अलीकडेच, प्यारेलाल यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला, भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मभूषण पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती.

प्यारेलाल यांना पद्मभूषण पुरस्काराची घोषणा - अलीकडेच, लक्ष्मीकांत यांची मुलगी राजेश्वरी लक्ष्मीकांतने या सन्मानाबद्दल आनंद व्यक्त करताना म्हटले, "प्यारेलाल काकांना अखेर हा पुरस्कार मिळाला याचा आम्हाला खूप आनंद आहे... आम्हाला असे वाटते की जेव्हा पद्मभूषण सन्मानाचा विचार केला जातो तेव्हा तुम्ही लक्ष्मीकांत-प्यारेलाल वेगळे केले पाहिजे. प्यारेलाल काका इथे आहेत म्हणून त्यांना वेगळे करून पुरस्कार देऊ शकत नाही आणि माझ्या वडिलांचे दुर्दैवाने निधन झाले आहे."

प्यारेलाल हे हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या आठ दशकांहून अधिक काळातील कारकिर्दीतील सर्वात यशस्वी संगीतकारांपैकी एक आहेत. या दिग्गज संगीतकाराने संगीतकार लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर यांच्या सहकार्याने असंख्य प्रतिष्ठित गाणी दिली आहेत. लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीने 'दोस्ती', 'हम सब उस्ताद हैं', आये दिन बहार के, 'मेरे हमदम मेरे दोस्त', 'मेरा गांव मेरा देश', 'बॉबी', 'रोटी' 'कपडा और' ही सदाबहार गाणी रचली. मकान, 'अमर अकबर अँथनी, आशा, प्रेम रोग, 'मेरी जंग', 'राम लखन', यासह प्रचंड संख्येने लोकप्रिय गाण्यांना संगीत साज चढवला आहे.

बॉलिवूडला दिले अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट - लक्ष्मीकांत-प्यारेलाल जोडीने 1960 पासून हिंदी चित्रपटसृष्टीत आपली छाप पाडण्यास सुरुवात केली. त्याची जादू इंडस्ट्रीवर दीर्घकाळ कायम राहिली. 1998 मध्ये लक्ष्मीकांत यांच्या निधनानंतर त्यांचे जोडी तुटली. तसं पाहिलं तर या जोडीने 500 हून अधिक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला सर्वात मोठे चार्टबस्टर दिले आहेत. त्यांनी 'दाग', 'दोस्ती', 'हम पांच' आणि 'तेजाब' सारखे चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.

हेही वाचा -

  1. निवृत्त आर्मी जनरल यांनी केलं 'फायटर'चं कौतुक, म्हणाले, "टॉम क्रूजपेक्षाही हृतिक सरस"
  2. विराट कोहलीची नक्कल करताना शाहिद कपूरचा मजेदार व्हिडिओ व्हायरल
  3. दीपिका पदुकोणने विमानतळावर दाखवली, 'वेड्या बहिणीची वेडी माया'

ABOUT THE AUTHOR

...view details