नवी दिल्ली - Miss World Karolina Bielauska : मिस वर्ल्ड कॅरोलिना बिएलॉस्काने भारत आणि बॉलिवूडवरील तिचं प्रेम शेअर केलं. शिक्षण, आरोग्य आणि तंत्रज्ञान यासह अनेक क्षेत्रात भारत चांगलं काम करत असल्याने जगासाठी प्रेरणादायी असल्याचे ती म्हणाली. भारतात ७१व्या मिस वर्ल्ड स्पर्धेचे आयोजन करण्यात आलंय. माजी मिस वर्ल्ड टोनी अॅन सिंग, व्हेनेसा पोन्स डी लिओन, मानुषी छिल्लर आणि स्टेफनी डेल व्हॅले यांच्यासह राजधानीत आयोजित प्री-लाँच कॉन्फरन्समध्ये कॅरोलिना सहभागी झाली होती.
भारत विशेष देश कशामुळे ठरतो याचा उल्लेख करताना तिनं एएनआयला सांगितलं की, "71वा मिस वर्ल्ड फेस्टिव्हल भारतात होतोय त्यामुळे मी अधिक उत्साहित होऊ शकत नाही कारण मला माहित आहे की, याचा सर्व स्पर्धकांवर त्याचा किती प्रभाव पडू शकतो. शिक्षण, आरोग्य आणि तंत्रज्ञानात क्षेत्रात यामध्ये भारत आघाडीवर आहे. माझा विश्वास आहे की तुमच्या देशात तरुण नेत्यांना आणून आम्ही प्रेरणा घेऊ शकतो आणि जगात एक बदल घडवू शकतो जो आम्हाला पाहायला आवडेल." कॅरोलिनाचा बॉलिवूडकडे विशेष कल आहे आणि ती ऐश्वर्या राय बच्चन, प्रियांका चोप्रा आणि मानुषी छिल्लर यांसारख्या अभिनेत्रींची मोठी चाहती आहे.
बॉलिवूडबद्दल बोलताना आणि इंडस्ट्रीमध्ये तिच्यासाठी संधीबद्दल बोलताना ती पुढे म्हणाली, "बॉलिवूड ही एक उत्तम इंडस्ट्री आहे, आणि त्यांचे मोठे योगदान आहे. त्यात ऐश्वर्या, प्रियांका आणि मानुषी यांसारख्या अप्रतिम अभिनेत्री आहेत. माझ्या वाट्याला संधी येणार असेल तर ती घेण्यासाठी मी खुली आहे."
कॅरोलिना अनेक तरुण मुलींसाठी प्रेरणा आहे. मिस वर्ल्ड स्पर्धेत भाग घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते आणि जरी नसले तरी अनेकजण फॅशन ट्रेंडचे अनुसरण करतात. तथापि, तिला असं वाटतं की सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आंतरिक सौंदर्य आहे आणि बाकीच्या वैयक्तिक आवडी निवडी आहेत. "माझा विश्वास आहे की हे सर्व तुमच्या वैयक्तिक आवडी निवडीबद्दल आहे, तुम्ही कसे दिसत आहात किंवा तुमचे चारित्र्य हे सर्व तुमच्या वैयक्तिक आवडी निवडीबद्दल आहे यावर माझा पूर्ण विश्वास आहे. जर एखाद्याला स्वतःबद्दल काहीतरी बदलायचे असेल तर ती त्याची वैयक्तिक निवड आहे. तुमच्याकडे अनेक पर्याय आहेत आणि लोक अनेक फॅशनला फॉलो करतात, पण मी सल्ला देईन की, केवळ विशिष्ट ट्रेंडमुळे स्वतःला, तुमचे चारित्र्य, तुमची वैशिष्ट्ये आणि तुम्हाला आवडत असलेल्या गोष्टी कधीही गमावू नका," कॉस्मेटिक शस्त्रक्रियांबद्दल बोलताना कॅरोलिना म्हणाली, महिलांना सुंदर होण्यासाठी प्लास्टिक सर्जरीची गरज आहे असे वाटू नये म्हणून प्रेरणा मिळेल.
तरुणांना सल्ला देताना ती पुढे म्हणाली, "मी तरुणांना एक सल्ला देऊ इच्छिते की जीवनात एक उद्देश शोधणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे कारण तुमचे करिअर अनेक गोष्टींवर अवलंबून असते. ते तुमच्या कामावर किंवा किती लोकांना आवडते यावर अवलंबून असते. तुमचे आरोग्य आणि संपत्ती डळमळीत होऊ शकते. पण हेतू ही अशी गोष्ट आहे की ती तुमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही."
71 वी मिस वर्ल्ड स्पर्धा 18 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान नवी दिल्लीतील भारत मंडपमसह विविध ठिकाणी होणार आहे. जगभरातील 120 स्पर्धक विविध स्पर्धा आणि सेवाभावी उपक्रमांमध्ये सहभागी होतील.
हेही वाचा -
- मिस वर्ल्डसाठी भारतात येणाऱ्या स्पर्धकांच्या पाहुणचारासाठी मानुषी छिल्लर उत्साही
- 90 वर्षांचा इतिहास अभिमानाने मिरवणारे चर्चगेट येथील इरॉस सिनेमागृह, 7 वर्षांनी नव्या अवतारात प्रेक्षकांच्या भेटीला
- चित्तथरारक 'क्रॅक'चा ट्रेलर रिलीज, विद्युत जामवाल आणि अर्जुन रामपालची जबरदस्त अॅक्शन