महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

मेगास्टार अमिताभ बच्चनच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी केली जलसाबाहेर गर्दी, व्हिडिओ व्हायरल - MEGA STAR AMITABH BACHCHAN

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या चाहत्यांनी जलसा निवासस्थानाबाहेर गर्दी केली होती. सोशल मीडियावर यातील काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

Amitabh Bachchan
अमिताभ बच्चन (अमिताभ बच्चन - ANI)

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 11, 2024, 3:42 PM IST

मुंबई - दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन 50 वर्षांहून अधिक काळापासून चाहत्यांच्या हृदयावर राज्य करत आहेत. त्यांचे करोडोंच्या संख्येनं चाहते आहेत. अनेकदा त्यांचे चाहते, त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी जलसा बाहेर पोहचतात. बिग बींच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी 11 ऑक्टोबर रोजी त्यांच्या जलसा निवासस्थानाबाहेर चाहत्यांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. त्यांची एक झलक पाहण्यासाठी अनेक चाहते दूरदूरहून आले होते. आता सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, यामध्ये चाहते अमिताभ यांच्या नावाच्या जयघोषणा करताना दिसत आहेत. अनेक चाहते अमिताभ बच्चन यांचा फोटो असलेल्या टी-शर्टमध्येही दिसत आहेत.

अमिताभ बच्चन यांना चाहत्यांनी दिल्या शुभेच्छा : अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जलसाबाहेर जमलेले चाहते आपल्या सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत आहेत. आज अमिताभ बच्चन हे ८२ वर्षांचे झाले आहेत. या वयातही ते फिल्मी जगतामध्ये खूप सक्रिय आहे. याशिवाय ते फिटनेसच्या बाबतीत तरुणांना देखील मात देतात. अनेकदा अमिताभ हे सोशल मीडियाच्या माध्यामातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहात असतात. त्यांना वाढदिवसाच्या विशेष प्रसंगी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेता मनीष पॉल काजोल , साऊथ अभिनेता प्रभास आणि इतर स्टार्सनं या विशेष प्रसंगी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

वर्कफ्रंट : दरम्यान अभिनेता अमिताभ यांच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सध्या ते 'केबीसी 16' मध्ये दिसत आहेत. नुकतेच आमिर खान आणि त्याचा मुलगा जुनैद या शोमध्ये पोहोचले होते. हा या शोचा मजेदार भाग असणार आहे. आज म्हणजेच 11 ऑक्टोबर रोजी हा भाग प्रसारित होणार आहे. अलीकडेच त्यांनी 'कल्की 2898 एडी' या चित्रपटात जबरदस्त ॲक्शन सीन देऊन प्रेक्षकांची मनं जिंकली होती. त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपर हिट ठरला. या चित्रपटामध्ये त्याच्याबरोबर साऊथ अभिनेता प्रभास आणि बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण दिसले होते. याशिवाय या चित्रपटामध्ये खलनायकाच्या भूमिकेत कमल हासननं केली होती. आता पुढं ते 'कल्की 2' या चित्रपटामध्ये दिसणार आहेत.

हेही वाचा :

  1. हॅपी बर्थडे बिग बी: वर्षातून दोनदा वाढदिवस का साजरा करतात अमिताभ बच्चन?
  2. 'वेट्टियान'चा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिल्यानंतर प्रेक्षकांना एक्स रिव्ह्यू
  3. रजनीकांत आणि बिग बी स्टारर 'वेट्टियान'चा बॉक्स ऑफिसवर दसरा धमाका

ABOUT THE AUTHOR

...view details